शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

...तर दादांना ध्वजारोहण करू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 01:00 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात राजू शेट्टी यांचा इशारा

कोल्हापूर : सरकारवर विश्वास ठेवून आम्ही ८०:२० फॉर्मुल्यावर विश्वास ठेवला. साखरेने ३५०० रुपयांचा टप्पा पार करूनही कारखानदार एफआरपीमधील २० टक्के देण्यास टाळाटाळ करत आहेत. १५ एप्रिलपर्यंत ही रक्कम दिली नाही आणि सरकार बघ्याची भूमिका घेणार असेल, तर १ मे ला महाराष्ट्र दिनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना ध्वजारोहण करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ‘एफआरपी’ तर द्यावी लागेलच, पण रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार उत्पन्नातील ७५ टक्के हिश्श्यासाठी आता रस्त्यावरची लढाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘एफआरपी’बाबत कारखानदार व सरकारची भूमिका व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रविवारी कोल्हापुरात ‘स्वाभिमानी’चा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी भगवान काटे होते. खासदार शेट्टी म्हणाले, दराबाबत ८०:२० टक्क्यावर तडजोड केली, ती कायमस्वरूपी नव्हती. साखरेचा दर तीन हजारांच्या वर गेल्यानंतर व्याजासह पैसे देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मेळावा घेणार म्हटल्यावर साखर आयुक्तांनी बैठक घेऊन २० टक्क्यासाठी १५ एप्रिलची डेडलाईन दिली. कारखानदारांनी जिल्हा बँकेत बैठक घेऊन त्याला खोडा घातला. १५ एप्रिलपर्यंत एफआरपीतील २० टक्के दिले नाहीत, तर सहकारमंत्र्यांनी साखर जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत, अन्यथा त्यांना महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करू देणार नाही. साखरेचे दर वाढल्याने एफआरपी प्रमाणे पैसे घेणारच, पण रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार उत्पन्नातील ७५ टक्के हिश्श्यासाठी रस्त्यावरची लढाई करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. सहकारमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवत सदाभाऊ खोत म्हणाले, साखरेच्या भाववाढीमागे ‘स्वाभिमानी’चे प्रयत्न आहेत. २० टक्क्यासाठी कारखानदार आढेवेढे घेत आहेत, घामाचे दाम देणार नसाल तर हात बांधून घरात बसणार नाही, ५० हजारांची फौज घेऊन रस्त्यावर उतरू. वर्मी घाव घातल्यानंतर कारखानदारांना गुडघे टेकायला लावू, असा इशाराही खोत यांनी दिला. दरम्यान, स्वाभिमानी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक गुरुवार (दि. ७) पासून दोन दिवस पिंपळगाव (जि. नाशिक) येथे होत आहे. यामध्ये दुष्काळासह विविध विषयांवर चर्चा होणार असून संघटनेत नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे संकेत खोत यांनी दिले. यावेळी जालंदर पाटील, वैभव कांबळे, तानाजी देसाई, अनिल मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर, भगवान काटे यांनी मनोगत व्यक्त केले. अण्णासाहेब चौगुले, विठ्ठल मोरे, संदीप राजोबा, सुभाष शेट्टी, सुरेश कांबळे, जयकुमार कोले, आदी उपस्थित होते. बिनशिक्क्याच्या पोत्यासाठी भरारीपथक! कारखानदार काटा मारतात, यासाठी वजनकाटेच आॅनलाईन करण्याची मागणी सरकारकडे करत आहे. रिकव्हरी मारण्याचा उद्योगही सुरू असून बिनशिक्क्याच्या पोत्यात साखर भरून काळ्या बाजारात विकली जात आहे, यावर नजर ठेवण्यासाठी परिसरातील कार्यकर्त्यांचे भरारीपथक नेमणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. मुश्रीफसाहेब, कागलच्या हातशिल्लकचे काय? जिल्हा बॅँकेतील खातेदारांकडून सक्तीने ११.४५ रुपये महिन्याला वसूल केले जातात. यासाठी बॅँकेवर धडक देऊ, बॅँक अडचणीत आहे म्हणून शेतकऱ्यांचे खिशे कापणार का? मुश्रीफसाहेब, कागल शाखेतील हातशिल्लक पळवली नसती तर अशा वसुलीचे काम करावे लागले नसते, असा टोला शेट्टी यांनी हाणला. म्हणूनच पवारांची कावीळ! जुलैमध्ये साखरेचे दर १९०० रुपये असताना व भविष्यात दर वाढणार हे माहिती असताना दुबळ्या व आजारी कारखान्यांना कोणी साखर विकण्यास सांगितली. आता ३८०० रुपये दर असताना साखर का विकत नाहीत. या कटाचा सूत्रधार कोण याची चौकशी सहकारमंत्र्यांनी करावी. यासाठीच शरद पवार यांची कावीळ झाल्याचे शेट्टी यांनी सांगितले. केंद्राचे ४५ रुपये अनुदान प्रोत्साहनासाठीच साखर निर्यात करणाऱ्यांना केंद्र सरकार ४५ रुपये प्रतिटन प्रोत्साहन अनुदान देणार आहे. हे अनुदान वजा करून एफआरपी देण्याचा डाव कारखानदारांचा आहे. एफआरपीमधील एक रुपयाला जरी हात लावाल तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.