शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
3
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
4
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
5
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
6
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
7
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
8
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
9
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
10
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
11
CSK स्टार मुरली विजयी दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
12
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
13
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
14
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
15
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
16
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
17
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
18
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
19
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
20
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

‘केशवराव’ जयंतीचा मुहूर्त साधणार का?

By admin | Updated: July 9, 2015 00:57 IST

उद्घाटनाची तारीख अनिश्चित : नाट्यगृह, खासबाग मैदानाच्या नूतनीकरणाची लगबग

कोल्हापूर : संगीत नाटकांमध्ये नवा सूर्योदय निर्माण करणारे संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या १२५व्या जयंतीचे आणि नाट्यगृहाच्या शताब्दीचे औचित्य साधून केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या नूतनीकरणाचे काम संपविण्याची लगबग सुरू आहे. मात्र महापालिकेकडून उद्घाटनासाठीची कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या नूतनीकरणाचे काम फेब्रुवारी २०१४ पासून सुरू आहे. ते काम आता संपत आल्याने या दोन्ही वास्तूंचे रूपडे पालटले असून, ते अधिक सुंदर झाले आहे. विशेषत: नाट्यगृहाचा रंगमंच आणि प्रेक्षागृह देखणे झाले आहे. ही पूर्ण वास्तू वूडन कल्चरमध्ये नूतनीकृत करण्यात आली आहे. शिवाय भिंतींवर कोल्हापूरची वैशिष्ट्ये सांगणारी म्युरल्स लावण्यात आली आहेत. प्रकाशयोजना, साउंड सिस्टीम, एसी, रंगमंच ही सगळी कामे आता संपली आहेत. खासबाग मैदानाचेही नूतनीकरण झाले, स्टेजची काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. आता नाट्यगृहाचे काम व्यवस्थित झाले आहे की नाही याची तपासणी सुरू करण्यात येणार आहे. नाट्यगृहात नव्याने प्रकाश योजना, साउंड सिस्टीम, एसी अशा यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. ज्या कलावंताच्या नावे ही वास्तू उभारण्यात आली, त्या संगीतसूर्य केशवराव भोसले यांची १२५ वी जयंती ९ आॅगस्ट रोजी साजरी होत आहे; तर नाट्यगृहाला १५ आॅक्टोबरला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर केशवराव भोसले यांच्या जयंतीचा मुहूर्त साधण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. मात्र जोपर्यंत नाट्यगृहातील खुर्च्यांचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत उद्घाटनासाठीची तारीख ठरविता येणार नाही. गेले दीड वर्ष मेहनत घेतल्यानंतर वास्तू खुली होणार आहे; त्यामुळे केवळ उद्घाटनासाठी घाई न करता परिपूर्ण नाट्यगृह खुले करणे महत्त्वाचे आहे, हेदेखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम झाले असले तरी खुर्च्या येईपर्यंत उद्घाटनाच्या तारखेसंबंधी कोणताही निर्णय घेता येणार नाही. केशवराव भोसले यांच्या जयंतीचे औचित्य साधून नाट्यगृह खुले करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. - नेत्रदीप सरनोबत (शहर अभियंता)नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी सगळ्याच कोल्हापूरकरांनी दीड वर्षे वाट पाहिली आहे. नाट्यगृहाचे उद्घाटन झाले की कार्यक्रमांसाठी, नाटकांसाठी खुले व्हावे अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे इतके दिवस थांबलो आणखी महिना-दीड महिना थांबण्याचीदेखील आमची तयारी आहे. नाट्यगृहातील व्यवस्थांची चाचणी, परवाने अशा सर्व बाबींची पूर्तता होऊन परिपूर्ण नाट्यगृहाचेच उद्घाटन व्हायला हवे. - प्रफुल्ल महाजन (नाट्य वितरक)