हातकणंगले तालुक्यातील महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळाच्यावतीने २४१ लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करून दिल्याबद्दल आमदार आवळे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
अनेक वर्षांपासून घरेलू मंडळाचे शेकडो लाभार्थी अनुदानापासून वंचित होते. पाठपुरावा करून ते मंजूर करून दिल्याबद्दल उपस्थित महिलांनी आमदार आवळे यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
या वेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, बाजार समितीचे सभापती चेतन चव्हाण, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष कपिल पाटील, रामभाऊ लोकरे, रणजित निकम आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक महिपती दबडे यांनी केले.
फोटो ओळी : घरेलू कामगार मंडळाच्या लाभार्थ्यांना नोंदणी कार्ड आमदार राजू आवळे यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी महिपती दबडे उपस्थित होते.