शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आघाड्यांचे भूत कोल्हापूरच्या मानगुटीवर पुन्हा बसणार काय..?

By admin | Updated: October 10, 2015 00:02 IST

मतदारांचीच कसोटी : काँग्रेसला रोखण्यासाठी ‘ताराराणी’ मैदानात

विश्वास पाटील -- कोल्हापूर--महापालिकेच्या राजकारणातील काँग्रेसच्या वर्चस्वाला मोडून काढण्यासाठी ताराराणी आघाडी मैदानात उतरली आणि आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजकारणाचा उदय झाला. आता पुन्हा तोच अजेंडा घेऊन महाडिक यांच्या छुप्या नेतृत्वाखालील ही आघाडी या निवडणुकीत मैदानात उतरली आहे. सत्ता हेच मुख्य साध्य असलेल्या या आघाडींचे भूत कोल्हापूरची जनता मानगुटीवर बसू देणार काय, हीच खरी उत्कंठा आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कधीही पक्षीय सत्ता असेल, तर काही प्रमाणात तरी कारभारावर वचक राहतो. केंद्र व राज्य शासनाकडून निधी आणता येतो. गेल्या पाच वर्षांत पक्षीय राजकारणामुळे हजार-बाराशे कोटी रुपये आले व घोडेबाजार झाला नाही. महाडिक यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी भूखंड लाटले नाहीत की कोणत्या टेंडरमध्ये रस दाखविला नाही, हे खरे असले तरी पदाधिकारी निवडून द्यायचे आणि तिथे काय चालते याकडे मात्र काडीचे लक्ष द्यायचे नाही, असा त्यांचा व्यवहार राहिला. त्यांच्याकडे एकहाती सत्ता होती. त्यावेळी या शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याची त्यांना संधी होती; परंतु तसे काहीच झाले नाही. फक्त व्यक्तिगत वर्चस्वाच्या राजकारणातच ते अडकून पडले. त्यातून ते आजही बाहेर आलेले नाहीत. आताही त्यांची ताराराणी आघाडी म्हणजे महाडिक गटाचे राजकारण पुन्हा प्रस्थापित करण्याचाच प्रयत्न आहे. लोकांचे प्रश्न, विकासाचे राजकारण असले काही विषय त्यांच्या खिजगणतीत नाहीत.कोल्हापूरच्या नगरपालिकेची महापालिका करण्याचे श्रेय दिवंगत नेते श्रीपतरावदादा बोंद्रे यांना जाते. त्यामुळे महापालिकेत सुरुवातीची पाच ते सहा वर्षे त्यांचा वचक राहिला. पुढे तत्कालीन खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे नेतृत्व मानणारा गट सत्तेत आला. दादा-साहेबांचे दरबारी राजकारण मोडून काढण्यासाठी महादेवराव महाडिक, व्ही. बी. पाटील, पत्रकार बी. आर. पाटील, पापा कौलवकर यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले. पुढे एका टप्प्यावर त्यातील महाडिक वगळता अन्य बाजूला झाले व काँग्रेसमधील राजकारणाची सोयरिक म्हणून त्यात पी. एन. पाटील, अरुण नरके यांचा समावेश झाला. किमान दहा वर्षे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक-नरके-पाटील या ‘मनपा’ लॉबीचे वर्चस्व राहिले. महाडिक महापालिकेत सत्ताधारी, पी.एन. हे सलग पाच वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले व इकडे ‘गोकुळ’मध्ये अरुण नरके सलग दहा वर्षे अध्यक्ष झाले. पुढे सांगरूळ मतदारसंघात महाडिक यांनी उघड पाठिंबा देऊन आतून धोका दिल्याचा अनुभव आल्यावर पी. एन. व महाडिक यांच्यात वैमनस्य आले. तत्पूर्वी १९९० च्या सुमारास ताराराणी आघाडीचा जन्म झाला; परंतु ही आघाडी निवडणुकीनंतर अस्तित्वात येई. प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र अपक्ष म्हणून नगरसेवक निवडून येत. त्यांना एकत्र करण्याचे काम महाडिक करीत असत. सुरुवातीच्या टप्प्यात या आघाडीने सामान्य कार्यकर्त्याला सत्तेची संधी दिली. शिवाजी पेठेतील सरदार तालीम प्रभागातून गाजलेल्या लढतीत शिवाजीराव चव्हाण यांचा पराभव करून भिकशेट पाटील विजयी झाले व महाडिक यांनी त्यांना १९९० ला महापौर केले. त्यामुळे महाडिक यांची चांगलीच ‘क्रेझ’ तयार झाली. -/ पान ८ वरएकमेव विजयगतनिवडणुकीत शाहू आघाडीच्या यशोदा मोहिते या गंजीमाळ प्रभागातून विजयी झाल्या. त्यांना १३०३ मते मिळाली. मोहिते या माजी नगरसेवक प्रकाश मोहिते यांच्या पत्नी होत. हे मोहिते आमदार महाडिक यांचे निष्ठावंत. काँग्रेसची उमेदवारी सतेज पाटील यांच्या आग्रहामुळे सचिन चव्हाण यांच्या पत्नीस मिळाल्याने मोहिते शाहू आघाडीकडे गेल्या. आता याच सौ. मोहिते भाजपकडून संभाजीनगर बसस्थानक प्रभागातून, तर स्वत: मोहिते नाथागोळे प्रभागातून ताराराणी आघाडीकडून रिंगणात आहेत.विक्रमसिंह घाटगे यांची ‘शाहू आघाडी’शाहू आघाडी दहा ठिकाणी दुसऱ्या स्थानांवर होती. त्यामध्ये शुगरमिल, कसबा बावडा, हनुमान तलाव, पोलीस लाईन, राजर्षी शाहू मार्केट यार्ड, शाहूपुरी उत्तर, विक्रमनगर, जवाहरनगर, पांजरपोळ, सागरमाळ या प्रभागांचा समावेश होता. या आघाडीचे शाहू कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे हे प्रमुख होते. ही आघाडी महाडिक यांचीच डमी असल्याची टीकाही त्यावेळी सातत्याने झाली. महापालिकेच्या राजकारणात यापूर्वी महालक्ष्मी आघाडी, नगरविकास आघाडी, शहर विकास आघाडी अशाही काही आघाड्या होऊन गेल्या आहेतले खा जो खास्थानिक आघाड्या.