शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

हातकणंगलेतून लढणार; सदाभाऊ खोत यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : दोनशे किलोमीटर जाऊन पाच लाख मते मिळाली होती. घरच्या मैदानात लढायला कोणतीही अडचण असणार नाही, असे सांगत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत रविवारी पत्रकार परिषदेत दिले.शिरोळ येथे ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या निवासस्थानी मंत्री खोत यांची ही पत्रकार परिषद झाली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : दोनशे किलोमीटर जाऊन पाच लाख मते मिळाली होती. घरच्या मैदानात लढायला कोणतीही अडचण असणार नाही, असे सांगत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत रविवारी पत्रकार परिषदेत दिले.शिरोळ येथे ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या निवासस्थानी मंत्री खोत यांची ही पत्रकार परिषद झाली. ‘स्वाभिमानी’चा उल्लेख न करता दसरा मेळाव्यात त्यांच्या पक्षाला भगदाड पडल्याचे दिसेल असेही ते म्हणाले. नव्या संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असून, येत्या दसरा मेळाव्यास विचारांतून परिवर्तनाचे सोनं लुटण्यासाठी आम जनतेने मोठ्या संख्येने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.२१ सप्टेंबरला घटस्थापनेदिवशी नव्या संघटनेची घोषणा कोल्हापुरात होणार आहे. यावेळी संघटनेचा मसुदा, झेंडा व बिल्ला यासह दिशा स्पष्ट केली जाणार आहे. त्यानंतर येत्या ३० सप्टेंबरला इचलकरंजी येथे होणाºया दसरा मेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी शिरोळ तालुक्यात दौरा केला असे खोत यांनी सांगितले.मंत्री खोत म्हणाले, मी लढवय्या कार्यकर्ता आहे. माझ्या चळवळीवर जनतेचा विश्वास आहे. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याचा काहीही परिणाम होणार नाही. सर्वच घटकांतील प्रश्न घेऊन संघटना पुढे जाणार आहे. संवादातून संघर्षाकडे अशी वाटचाल केली जाणार आहे, असेही खोत म्हणाले.बैठकीस भाजपचे सुरेशदादा पाटील, सागर खोत, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, रणजित पाटील, विजय भोजे, धैर्यशील देसाई, आप्पासाहेब काळे, बजरंग काळे, आदी उपस्थित होते. दरम्यान, जयसिंगपूर येथे शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन मंत्री खोत यांनी चर्चा केली.‘स्वाभिमानी’च्या बालेकिल्ल्यात रणनीतीशिरोळ हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला मानला जातो. यातच खासदार राजू शेट्टी व मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात फूट पडली आहे. अशातच मंत्री खोत तालुक्यातील उमळवाड, कोथळी, दानोळीसह परिसरात दौरा व बैठका घेत आहेत. या बैठकीत स्वाभिमानीचे कार्यकर्तेही सहभागी होत आहेत. त्यामुळे आगामी कोणत्या निवडणुकीची रणनीती आखली जात आहे, याची चर्चा आहे. शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ल्यात आता मंत्री खोत यांची एंट्री चर्चेची ठरली आहे.