शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

डोक्यात पाटा घालून पत्नीचा खून

By admin | Updated: June 15, 2014 01:51 IST

यादवनगरातील घटना : चारित्र्याच्या संशयावरून कृत्य; पती फरार

कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून आज, शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात पतीने दगडी पाटा घालून तिचा निर्घृण खून केला. आरती संजय केंगार (वय २८, रा. यादवनगर, नवीन वसाहत) असे तिचे नाव आहे. संशयित आरोपी पती संजय विश्वास केंगार हा पसार झाला आहे. पोलिसांनी सांगितले, संजय केंगार चारित्र्याचा संशय घेत पत्नी आरती हिला सतत मारहाण करीत असे. तो सेंट्रिंगचे काम करतो. रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून ते झोपले. पहाटे सहाच्या सुमारास त्याची आई दारात नळाला पाणी भरण्यासाठी गेली. आरती ही दोन मुलांसह पुढल्या सोप्यात झोपली होती. यावेळी संजय याने घरातील स्वयंपाकघरातील दगडी पाटा उचलून तिच्या डोक्यात घातला. घरातून मोठा आवाज व किंकाळी ऐकू आल्याने पाणी भरत असलेली त्याची आई घरात धावत आली. यावेळी संजय गडबडीने निघून गेला. घरात अंथरुणामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आरतीला पाहून तिने आरडाओरडा केला. यामुळे शेजारील लोकांनी घराकडे धाव घेतली. खुनाचे वृत्त कळताच राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरतीच्या मृतदेहाजवळ बसून तिची दोन मुले व सासू आक्रोश करीत होती. पंचनामा करून आरतीचा मृतदेह सीपीआरला विच्छेदनासाठी हलविण्यात आला. याप्रकरणी आरतीची आई सुमन रामचंद्र हत्तीकाटे (रा. जगीवाडा, सातारा) हिने जावई संजय याच्याविरोधात फिर्याद दिली. आईशी शेवटचे बोलणे संजय नेहमी चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करीत होता. हा त्रास असह्य झाल्याने आरतीने आईला हा सगळा प्रकार सांगून आपणास माहेरी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार तिची आई काल, शुक्रवारी कोल्हापुरात आली. तिची दुसरी मुलगी शास्त्रीनगर येथे आहे. तिच्याकडे ती रात्री मुक्कामाला राहिली. यावेळी तिने ‘उद्या, शनिवारी तुला घेऊन जाण्यासाठी घरी येते’ असे फोनवरून सांगितले होते. त्यामुळे आरतीने रात्रीच कपड्यांची बॅग भरली होती. यावेळी माहेरी जाण्यावरून पती-पत्नीत वाद झाला होता. दरम्यान, आज तिची आई येण्यापूर्वीच सुडाने पेटलेल्या संजयने तिचा खून केला. (प्रतिनिधी)