शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याच सुविधा नसताना संस्थात्मक अलगीकरणाचा हट्ट का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 15:12 IST

धामोड येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीत गेल्या दोन दिवसापासून कोरोना निगेटीव्ह अहवाल येऊनही यातना सोसत असलेल्या ग्रामस्थांनी आज तीव्र संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देकोणत्याच सुविधा नसताना संस्थात्मक अलगीकरणाचा हट्ट का ?धामोड ग्रामपंचायत प्रशासनाची आडमुठी भूमिका

श्रीकांत ऱ्हायकरधामोड- धामोड येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीत गेल्या दोन दिवसापासून कोरोना निगेटीव्ह अहवाल येऊनही यातना सोसत असलेल्या ग्रामस्थांनी आज तीव्र संताप व्यक्त केला.

या इमारतीत कोणत्याही भौतिक सुविधा तर नाहीतच, शिवाय येथे कॉरंटाईन असलेल्या व्यक्तींना जेवण,चहा, नाष्टाही विचारला जात नव्हता. म्हणुन या लोकांनी येथील अस्वच्छतेचा व्हिडिओ थेट आरोग्य राज्यमंत्र्यांना पाठवल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. राधानगरी तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन सर्व व्यक्तींना होम कॉरंटाईन करत विषयावर पडदा टाकला.धामोड ( ता.राधानगरी ) येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीला चार दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली. या व्यक्तीने धामोड येथील दोघा डॉक्टरांबरोबर भोगावती येथेही उपचार घेतले होते. त्यामुळे संपर्कात आलेल्या सर्वच लोकांनी राधानगरी कोविड सेंटरकडे स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली. त्यात सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे  ग्रामपंचायत प्रशासनाने या सर्वांना संस्थात्मक कॉरंटाईन केले. पण त्यांना ज्या प्राथमिक शाळेत कॉरंटाइन केले,तेथे ना शौचालय, ना बाथरूम. संपूर्ण परिसर दुर्गंधीयुक्त झाल्याने सर्वत्र डासांचे साम्राज्य होते. या लोकांना जेवण तर सोडा, साधा चहा देखील या दोन दिवसात विचारला गेला नाही. त्यामुळे येथील लोकांची तिथल्या अस्वच्छतेचा व्हिडीओ करून तो थेट आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना पाठवला. त्यामुळे राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर व गटविकास अधिकारी संदिप भंडारे यांनी घटनास्थळी भेट देऊन कॉरंटाईन झालेल्या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण हे सर्व लोक तेथील अस्वच्छतेच्या प्रश्नावर अडून होते. समजूतीअंती या सर्वांना त्यांच्या-त्यांच्या घरी कॉरंटाईन केले. संपर्क यादी बनवताना दुजाभावपॉझीटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी बनवतानाच दुजाभाव केला गेला आहे. प्रतिष्ठीत लोकांची नावे वगळून सामान्यांना स्वॅब देण्याची सक्ती केली गेली. आता हे सर्व लोक संस्थात्मक कॉरंटाईन तर प्रतिष्ठीत लोक आपापल्या घरात निवांत असल्याचे या कक्षातील एका तरुणाने बोलून दाखवले. आरोग्य मंत्र्यांच्या एका फोनने आजची यंत्रणा हलली खरी. पण इथल्या परिसर स्वच्छतेचा प्रश्न मात्र कायमस्वरूपी निकाली निघणार का ?असाही प्रश्न या निमित्ताने समोर येतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर