शहरं
Join us  
Trending Stories
1
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
2
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
3
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
4
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
5
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
6
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
7
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
8
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
9
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
11
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
12
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
13
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
14
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
15
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
16
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
17
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
18
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

काम देता का काम, रोजगारासाठी ९ हजार जाणांची नोंदणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:29 IST

कोल्हापूर : अनलॉकनंतर व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने बेरोजगार नोकरीच्या शोधात विविध ठिकाणी अर्ज करीत आहेत. नोकरीसाठी वर्षभरात येथील ...

कोल्हापूर : अनलॉकनंतर व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने बेरोजगार नोकरीच्या शोधात विविध ठिकाणी अर्ज करीत आहेत. नोकरीसाठी वर्षभरात येथील स्वयंरोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयात ८ हजार ९५७ जणांनी नोंदणी केली आहे. यापैकी ५ हजार ९७३ जणांना खासगी कंपनीत व इतर ठिकाणी नोकरी मिळाली आहे. उर्वरित अजूनही नोकरीच्या शोधात आहेत.

कोरोना आजार नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनचा उपाय अवलंबल्याने मंदीचे सावट गडद झाले आहे. परिणामी नव्याने निर्माण होणाऱ्या नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. काही ठिकाणी नोकरकपातही केल्याने बेरोजगारीत पुन्हा भर पडली आहे. यामुळे नोकरीसाठी स्वयंरोजगार, उद्योजकता कार्यालयाकडे नोंदणी करण्याकडे कल वाढला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर लॉकडाऊन झाल्याने रोजगार नसल्याने आठ महिन्यांत सर्वाधिक मार्च महिन्यात २१९७ जणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. मात्र त्या महिन्यात केवळ १०८ जणांनाच नोकरी मिळाली आहे. मे महिन्यात नोंदणी केलेल्यांपैकी फक्त एकासच नोकरी मिळाली आहे. गेल्या आठ महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात नोकरीच्या सर्वाधिक संधी निर्माण झाल्याने ३ हजार ३८९ जणांना नोकरी मिळाली. एप्रिल, जुलै, ऑगस्ट वगळता इतर महिन्यात नोंदणीपेक्षा निम्म्याहून कमी लोकांना नोकरी मिळाली आहे.

चौकट

कोणत्या महिन्यात किती नोंदणी?

जानेवारी -१०१४

फेब्रुवारी - १३२२

मार्च -२१९७

एप्रिल -६८४

मे - ३१८

जून - ७२६

जुलै - १४८८

ऑगस्ट - १२०८

कोणत्या वर्षात किती नोंदणी ?

२०१५- ११००७

२०१६-८५७९

२०१७-१७६२०

२०१८-२४७११

२०१९-२१४४३

२०२०-१६४९६

२०२१ ऑगस्टअखेर -८९५७

या वर्षात ५ हजार ९७३ जणांना मिळाला रोजगार

कोरोनामुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. खासगी क्षेत्रात नव्याने नोकऱ्यांच्या जागा निर्माण होण्यालाही मर्यादा आल्या आहेत. तरीही स्वयंरोजगार आणि उद्योजकता कार्यालयाकडे जानेवारी २०२१ ते ऑगस्टअखेर पर्यंत नोंदवलेल्या ८ हजार ९५७ पैकी ५ हजार ९७३ जणांनाच नोकरी मिळाली आहे.

अनेकांनी पकडली मुंबई पुण्याची वाट

स्वयंरोजगार, उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयाकडे नोंदणी करूनही नोकरी न मिळालेले बेरोजगार पुणे, मुंबईची वाट धरत आहेत. गावाकडेही भाकरीचा प्रश्न सुटत नसल्याने ते मोठ्या शहरात जाऊन नोकरीचा शोध घेत आहेत. तेथे मिळेल ती नोकरी ते करीत आहेत. बेरोजगारांची संख्या अधिक आणि जागा कमी असे चित्र असल्याने रोजगारीची समस्या भीषण जाणवत आहे.

कोट

नोकरीसाठी आपल्या कार्यालयाकडे या वर्षात ८ हजारपेक्षा अधिक बेरोजगारांनी नोंदणी केली आहे. यातील अनेक जणांना ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित करून नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. नोंदणी केलेल्या अधिकाअधिक जणांना नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे.

संजय माळी, सहायक आयुक्त, स्वयंरोजगार, उद्योजकता विभाग