शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास लाखाचे बक्षीस घेणार कोण... फोन अजून आलाच नाही.. पोलीस प्रतिक्षेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 18:00 IST

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील फरार मारेकरी संशयित विनय बाबूराव पवार (वय ४०, रा. उंब्रज, ता. कºहाड, जि. सातारा), सारंग दिलीप अकोळकर ऊर्फ कुलकर्णी (३८, रा. डी. एस. के. चिंतामणी अपार्टमेंट, शनिवार पेठ, पुणे) यांची माहिती देणाऱ्यास राज्य शासनाने ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले

ठळक मुद्देपवार, अकोळकर यांच्या माहितीचा एकही फोन नाही पोलिसांच्या आवाहनाला जनतेतून प्रतिसाद नाही शासनाकडून माहिती देणाऱ्यास ५० लाखांचे बक्षीस : पानसरे हत्या प्रकरण

-एकनाथ पाटील

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील फरार मारेकरी संशयित विनय बाबूराव पवार (वय ४०, रा. उंब्रज, ता. कºहाड, जि. सातारा), सारंग दिलीप अकोळकर ऊर्फ कुलकर्णी (३८, रा. डी. एस. के. चिंतामणी अपार्टमेंट, शनिवार पेठ, पुणे) यांची माहिती देणाऱ्यास राज्य शासनाने ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. गेल्या सात दिवसांत पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या फोन नंबरवर एकही कॉल आला नसल्याचे सूत्रांनीच स्पष्ट केले. शासन आणि तपास यंत्रणेच्या आवाहनाला जनतेतून प्रतिसाद दिसत नसल्याचे चित्र आहे. या दोघा संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध राज्यांत विशेष पथके रवाना केली आहेत. तपास पथकांमध्ये आणखी सात नवीन अधिकाऱ्यांना घेतले आहे. ते अधिकारी नेमके करतात तरी काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

संशयित आरोपी विनय पवार व सारंग अकोळकर या दोघांचा पानसरे हत्येमध्ये समावेश असल्याचे ‘एस.आय.टी.’ने दोषारोपपत्रानुसार न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या दोघांची माहिती आणि फोटो असलेली भित्तिपत्रके देशात व राज्यातील शासकीय कार्यालये, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी चिकटवून, वर्तमानपत्रांतही (वाँटेड) असल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. दोघेही सन २००९ च्या मडगाव बॉम्बस्फोटापासून फरार आहेत. त्यापासून पोलीस यंत्रणा त्यांचा शोध घेत आहे. तपास यंत्रणेचे सुराग थांबल्याने संशयित पवार आणि अकोळकर यांची जनतेतून माहिती मिळण्यासाठी २७ मार्चला शासनाने ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे), विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, अप्पर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, विशेष तपास पथक, एसआयटी यांचे फोन क्रमांक प्रसिद्ध करून त्यावर नागरिकांनी माहिती द्यावी, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले होते. गेल्या सात दिवसांत या नंबरवर संशयितांची माहिती देण्यासाठी किती फोन आले, या संदर्भात प्रत्येक कार्यालयाच्या फोन नंबरवर चौकशी केली असता आजपर्यंत असा एकही फोन आला नसल्याचे येथील कर्मचाºयांनी सांगितले.चुकीचा नंबर आहे....

गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) या कार्यालयाच्या नंबरवर संपर्क साधला असता येथील महिला हवालदाराने ‘पवार आणि अकोळकर कोण आहेत?’ असा प्रश्न केला. सविस्तर माहिती दिल्यानंतर असा फोन आला नसल्याचे सांगितले. तसेच हा चुकीचा नंबर दिला आहे. नियंत्रण कक्षाशी संपर्क सांधा, असे सांगण्यात आले.

 

पानसरे हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आहे; त्यामुळे या गुन्ह्याच्या संदर्भात कोणतीही माहिती आम्ही देऊ शकत नाही.- वरिष्ठ पोलीस अधिकारी, कोल्हापूर

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेPoliceपोलिस