शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

विमानतळ भूसंपादन प्रस्ताव देणार कोण ?

By admin | Updated: May 8, 2015 00:13 IST

विस्तारीकरण रखडले : अतिरिक्त ५.६0 हेक्टर जमीन आवश्यक, जमीन देण्यास वनविभागाची तयारी

संतोष मिठारी- कोल्हापूर -कोल्हापूरच्या विकासाची जीवनवाहिनी असणारी विमानसेवा सुरू होण्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण महत्त्वाचे आहे. विस्तारीकरणासाठी अतिरिक्त ५.६० हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. ती देण्यासाठी वनविभागाची तयारी आहे. मात्र, जमिनीची मागणी करणारा प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी कोणाची, यावरून हे अतिरिक्त भूसंपादन अडकले आहे.आधी धावपट्टीची दुरुस्ती, मग विमान कंपन्यांचा नकार यामुळे गेल्या चार वर्षांपासून कोल्हापूरची विमानसेवा बंद आहे. ती सुरू होण्यासह याठिकाणी मोठी विमाने उतरविण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी अतिरिक्त ५.६० हेक्टर जमिनीची गरज आहे. विमानतळाच्या गडमुडशिंगीकडील बाजूला वनविभागाची दहा हेक्टर जागा आहे. त्यातील पाच हेक्टर जमीन देण्यासाठी वनविभाग तयार आहे. तांत्रिकदृष्ट्या विमानतळ परिसरातील अन्य जमीन विस्तारीकरणासाठी योग्य नसल्याने वनविभागाच्या जमिनीचा एकमेव पर्याय आहे. विमानतळासाठी संबंधित जमीन हस्तांतरित करण्याच्या बदल्यातील पर्यायी जमीन जिल्हा प्रशासनाने वनविभागाला शेंबवणे (ता. शाहूवाडी) याठिकाणी देऊ केली आहे. वनविभागाला ती जमीन मान्य आहे. विमानतळासाठीच्या जमिनी हस्तांतरित करण्यासाठी वन विभागाकडे प्रस्ताव द्यावा लागणार आहे. मात्र, जमीन मागणीचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) की, सध्या विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या भारतीय विमानपतन प्राधिकरणाने पाठवायचा यावर अतिरिक्त भूसंपादन अडकले आहे. जी संस्था विमानतळ वापरणार आहे आणि चालविणार आहे, त्या संस्थेने भूसंपादनाचा प्रस्ताव पाठवावा, असा शासकीय आदेश विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी गेल्या महिन्यात कोल्हापुरातील बैठकीत दाखविला. भूसंपादनाबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची जबाबदारी विमानतळ प्राधिकरणाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर प्रस्ताव तयार करण्याबाबत प्राधिकरणाकडून काहीच कार्यवाही झालेली नाही. निव्वळ प्रस्तावाअभावी रखडलेले भूसंपादन विमानतळाच्या विकासाला मारक ठरत आहे.वनविभागाने दिला प्रस्तावाचा नमुनाभूसंपादनासाठी वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत विहित नमुन्यामध्ये प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्याबाबतचा मॉडेल फाईलच्या माध्यमातून प्रस्तावाचा नमुना वनविभागाने प्राधिकरणाला दिला असल्याचे कोल्हापूरचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रस्तावात भूसंपादनाच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या जमिनी, प्रकल्प, आदींची माहिती द्यावी लागणार आहे. विमानतळाला हस्तांतरित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या बदल्यात जिल्हा प्रशासनाकडून मिळणारी जमीन वनविभागाने मान्य केली आहे. विमानतळासाठी प्रस्ताव आल्यानंतर ती जमीन हस्तांतरित केली जाईल.मुंबईतील बैठकीची प्रतीक्षाप्राधिकरणाकडे विमानतळ हस्तांतरण करण्यावेळी सामंजस्य करार होणार होता. मात्र, तो झालेला नाही. त्यामुळे विमानतळ विस्तारीकरणासाठीच्या प्रकल्पाची जबाबदारी निश्चित झालेली नाही. प्राधिकरणाचे कामकाज मुख्यत: मुंबईतून होते. त्यामुळे मंत्रालयात या अनुषंगाने बैठक होणे आवश्यक असल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. जबाबदारी निश्चित झाल्यानंतर तांत्रिक अधिकाऱ्याची नियुक्ती होणे आवश्यक आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार प्राधिकरण आणि वनविभाग मुंबईतील या बैठकीच्या प्रतीक्षेत असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.