शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोवारांच्या विरोधात लढणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:22 IST

कोल्हापूर : गेली २५ वर्षे प्रभागात विकासकामांच्या जोरावर एकहाती वर्चस्व ठेवलेले काँग्रेसचे दिलीप पोवार यांच्या विरोधात लढणार कोण एवढीच ...

कोल्हापूर : गेली २५ वर्षे प्रभागात विकासकामांच्या जोरावर एकहाती वर्चस्व ठेवलेले काँग्रेसचे दिलीप पोवार यांच्या विरोधात लढणार कोण एवढीच उत्सुकता कनाननगर प्रभागात राहिली आहे. शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अजूनही पोवारांना टक्कर देऊ शकेल, अशा ताकदीच्या उमेदवाराच्या शोधात आहे. महापालिकेची निवडणूक पुढे गेल्याने प्रभागातही कोणतेही निवडणुकीचे वारे दिसत नाही. त्यामुळे विद्यमान नगरसेवक हे प्रभागातील शिल्लक कामे पूर्ण करण्यात गुंतले आहेत, तर विरोधी पक्ष चांगल्या उमेदवारांच्या शोधात आहे; पण त्यांचा शोध अजूनही संपलेला नाही. त्यांच्याविरोधात लढण्यास कोणीही स्थानिक धजेनासे झाले आहेत.

७२ एकरातील १३६५ झाेपडपट्ट्यांमध्ये ७ हजार ८०० लोकसंख्येचा हा प्रभागही आता संमिश्र झाला आहे. झोपडपट्टी आणि इतर सुशिक्षित असा निम्मा निम्मा प्रभाग आहे. त्यामुळे दोन्ही वर्गातील समस्यांचा येथे सामना करावा लागतो. रेल्वेस्टेशन, ट्रेड सेंटर, घोरपडे गल्ली, बसंत बहार टॉकीज, रॉयल एनफिल्ड, अशोक पार्क अशा विस्तारलेल्या या प्रभागात दिलीप पोवार यांची पकड राहिली आहे. पोवार यांनी या भागाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले. ते विद्यमान नगरसेवक असून मागील वेळी भाजपच्या सुनील मोदी यांच्यावर त्यांनी १२७० मते घेत मात केली होती.

कनाननगर हा १५ नंबरचा प्रभाग आता ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे तर उमेदवारांची प्रचंड वानवा आहे. दिलीप पोवार यांच्या पत्नी आणि माजी बालकल्याण सभापती सरस्वती पोवार यांचे एकमेव नाव सध्या प्रभागात चर्चेत आहे. काँग्रेसकडून त्या पुन्हा रिंगणात असणार आहेत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीकडे विचारणा केल्यावर अजून काही ठरले नसल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप तर गतवेळच्या निवडणुकीत ९६५ मते घेऊन दोन क्रमांकचा पक्ष ठरला होता; पण त्यांचे उमेदवार राहिलेले सुनील मोदी यांनी भाजप आणि महापालिका राजकारणापासून फारकत घेतली नाही. त्यामुळे येथे यावेळी भाजपकडून स्थानिक उमेदवारच नाही.

काम हाच प्रचार हे सूत्र मानून दिलीप पोवार यांनी आताही निवडणुका कधीही जाहीर होऊ देत म्हणत कामांचा धडाका लावला आहे. ताराबाई पार्क, नागाळा पार्क, शाहूपुरी या श्रीमंत वस्त्यांच्या मध्ये असलेल्या झाेपडपट्टी वजा या प्रभागाचा आता कायापालट झाल्याचे दिसत आहे. सरकारी योजनांचा आधार घेत पक्क्या आरसीसी घरासह झोपडपट्टी हा शिक्का पुसण्याचे काम विद्यमान नगरसेवकांकडून झाले आहे. रस्ते, गटारी, स्ट्रेट लाइट, पाणी या मूलभूत सुविधा उत्तम प्रकारे दिल्या जात असल्याने महाराष्ट्रातील आदर्श झोपडपट्टी म्हणून नावलौकिक प्राप्त झाला आहे.

शंभर टक्के हगणदारीमुक्त प्रभाग म्हणून कनाननगरने लौकिक मिळवला आहे.

झालेली कामे

स्ट्रीट लाइट, पक्क्या डांबरी रस्त्यांची कामे पूर्ण

गल्लोगल्ली, बोळाबाेळांत ३३०० मीटरची ड्रेनेज लाइन

दोन बोअरसह महापालिकेकडून मुबलक पाणी

प्रत्येकाच्या घरात शौचालय बांधून दिले

शिल्लक कामे

प्राॅपर्टी कार्डचे काम अजून अर्धवट आहे

कचऱ्याचा उठाव वेळेत होत नसल्याच्या तक्रारी

सार्वजनिक दवाखान्याचे कामदेखील अजून मंजुरीत

प्रभाग: १५

विद्यमान नगरसेवक : दिलीप पोवार (काँग्रेस)

आताचे आरक्षण : ओबीसी महिला

गतवेळी पडलेली मते

दिलीप पोवार : १२७० (काँग्रेस)

सुनील मोदी : ९६५ (भाजप)

सागर घोरपडे : ४२८ (शिवसेना)

मधुकर काकडे : २७६ (राष्ट्रवादी)

प्रतिक्रिया

खूप विकासकामे करून झाेपडपट्टीचा चेहरामोहराच बदलल्याचे समाधान आहे. प्रॉपर्टी कार्डसाठी आयुक्तांच्या टेबलावर फाइल आहे. त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सार्वजनिक दवाखाना उभारण्याचे शिल्लक राहिलेले काम कोणत्याही परिस्थितीत काही महिन्यांत पूर्ण करणार आहे.

-दिलीप पोवार, विद्यमान नगरसेवक

चौकट ०१

महापालिकेचे महापौरपद ओबीसी महिलेसाठी या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. कनाननगरचे आरक्षणदेखील हेच असल्याने आगामी महापौर येथून झाला तर आश्चर्य वाटायला नको. कनाननगरला अद्याप महापौरपदाची संधी मिळालेली नसल्याने त्यादृष्टीने काँग्रेसने रणनीती ठरवल्याचे दिसत आहे.

फोटो: २७०३२०२१-कोल-कनाननगर

फोटो ओळ: कनाननगर प्रभागात रॉयल एनफील्डच्या मागे कचऱ्याची उचल वेळेत होत नसल्याने असे कोंडाळे भरून वाहताना दिसत आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)