शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कोण होते केशवराव भोसले ?, खुद्द राजर्षी शाहू छत्रपती यांनी त्यांना दिली होती ‘वन्स मोअर’ची शाब्बासकी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 12:48 IST

मराठी रंगभूमीवरील एक असामान्य प्रतिभेचा, गुणवान, कीर्तिवान गायक, नट असा कलावंत म्हणजेच केशवराव भोसले. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून स्वदेश ...

मराठी रंगभूमीवरील एक असामान्य प्रतिभेचा, गुणवान, कीर्तिवान गायक, नट असा कलावंत म्हणजेच केशवराव भोसले. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून स्वदेश हितचिंतक नाटक मंडळींत प्रवेश. वयाच्या दहाव्या वर्षी शारदा नाटकातील ‘मूर्तिमंत भीती उभी’ या पदाने त्यांना कीर्ती मिळवून दिली. खुद्द राजर्षी शाहू छत्रपती यांनी त्यांना ‘वन्स मोअर’ची शाब्बासकी दिली. पुढे १९०८ साली वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी ‘ललित कलादर्श नाटक मंडळी’ ही कंपनी सुरू केली. रंगभूमीला मखमली पडदा, ‘मानापमान’मधील धैर्यधराच्या छावणी असा अनेक प्रथा त्यांनी सुरू केल्या. शाहू छत्रपतींनी १९१६ साली केशवरावांना आपली कंपनी घेऊन कोल्हापूरला बोलावले. त्यांचा मोठा गौरव केला. पॅलेस थिएटरच्या मागे खासबाग मैदानात खुले नाट्यगृह तयार करून ‘मृच्छकटिक’ या नाटकाचा प्रयोग या रसिकराजाने आपल्या प्रजेस दाखवला. भा. वि. वरेकरांनी आपले ‘कुंजविहारी’ हे नाट्य शाहू छत्रपतींना अर्पण केले. त्याप्रसंगी छत्रपती त्यांना म्हणाले, ‘वरेकर, तुम्ही मला नाटक अर्पण केलेत, यात माझा मोठा मान आहे. आता माझा केशा (केशवराव भोसले) स्वत: उभा राहिला आहे. त्याला एक नाटक लिहून द्या; पण केशवला मात्र विसरू नका. केशा म्हणजे तळपती तलवार आहे. ती जर हाती मिळाली तर तुम्ही जग जिंकाल..’ याच केशवराव यांच्या नावे हे नाट्यगृह होते, जे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले..

टॅग्स :kolhapurकोल्हापूर