शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महापौर कोण? उत्कंठा शिगेला

By admin | Updated: November 10, 2015 00:34 IST

कॉँग्रेसकडे ४४, तर भाजपकडे शिवसेना गृहीत धरून ३७ नगरसेवक

कोल्हापूर : महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सध्या कॉँग्रेसकडे राष्ट्रवादीचे १५ व २ अपक्षांसह ४४ असे बहुमत मिळविणारे संख्याबळ आहे, तर भाजप-ताराराणी आघाडीकडे शिवसेनेचे चार गृहीत धरून व १ अपक्षासह ३७ नगरसेवक आहेत. त्यांना सत्तेसाठी आणखी चार नगरसेवकांची आवश्यकता आहे. तरीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर ‘भाजप’चाच होईल, असे वारंवार सांगितल्यामुळे चुरस निर्माण झाली असून विशेषत: कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून मोठी खबरदारी घेण्यात आली आहे.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मोठी आमिषे दाखविली गेल्याची चर्चा आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीसह कॉँग्रेसच्या नेत्यांनीही नगरसेवकांना पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या नगरसेवकांशी कोण भेटतोय, यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडे अपेक्षित संख्याबळ असतानाही भाजपचा महापौर करण्यासाठी भाजप-ताराराणीने महापौरपदाचे गणित जुळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सरूकेले आहेत. सभागृहात हात वर करून उघडपणे मतदान करायचे आहे. म्हणूनच ताराराणीचे कारभारी हे गणित कसे जमवायचे, पर्याय काय ठेवायचे, याच्यावर विचारविनिमय करीत आहेत. महापौरपदाचे उमेदवार कॉँग्रेस : आश्विनी रामाणे, दीपा मगदूम, स्वाती यवलुजे, उमा बनछोडे. भाजप : मनीषा कुंभार, गीता गुरव, सविता भालकर. उपमहापौरपदाचे उमेदवार राष्ट्रवादी कॉँग्रेस : शम्मा मुल्ला, सूरमंजिरी लाटकर, वहिदा सौदागर.ताराराणी आघाडी : किरण शिराळे, ईश्वर परमार.कॉँग्रेस,राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या मुलाखतीकोल्हापूर : महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सायंकाळी कॉँग्रेस व राष्ट्रवादीमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. कॉँग्रेसकडून महापौरपदासाठी चार नगरसेविका, तर राष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठी तीन नगरसेविकांनी आपल्या नावाचा आग्रह धरला आहे. आज, मंगळवारी दुपारी त्या त्या पक्षाचे नेते कोणाला महापौर व उपमहापौर करायचे हे ठरविणार आहेत. त्यामुळे या पदांचे दावेदार कोण असतील, याची उत्कंठा वाढली आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजता स्टेशन रोडवरील कॉँग्रेस कार्यालयात जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी मंत्री सतेज पाटील यांनी पक्षातील चार इच्छुक नगरसेविकांच्या मुलाखती घेतल्या.त्यानंतर कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांना सतेज पाटील व पी. एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या उपमहापौरपदासाठीच्या उमेदवारांच्या मुलाखती सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विश्रामगृहावर माजी मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर, आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील, के. पी. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडल्या. उपमहापौरपदासाठी पक्षाकडून चौघे इच्छुक असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले; परंतु त्यांची नावे सांगण्यास नकार दिला.