शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

कोल्हापूरकरांवर आंदोलनांची वेळ आणली कुणी ? : राज्यकर्ते, प्रशासनच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:45 IST

कोल्हापुरात कोणत्याही प्रश्नासाठी ऊठसूट आंदोलने केली जात असल्याची टीका गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केली; परंतु राज्यकर्ते व जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच जनतेला

ठळक मुद्दे‘संघर्ष’ येथील लाल मातीचा गुणच; स्वत:च्या हिमतीवर जिल्ह्याचा विकास

कोल्हापूर : कोल्हापुरात कोणत्याही प्रश्नासाठी ऊठसूट आंदोलने केली जात असल्याची टीका गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केली; परंतु राज्यकर्ते व जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच जनतेला आंदोलने करावी लागत असून, लोकांवर आंदोलनाची वेळ आणली कुणी? अशी विचारणा होऊ लागली आहे.

दुधाचे मोजमाप इलेक्ट्रॉनिक काट्याऐवजी लिटर मापानेच करायचे असा शासनाने काढलेला आदेश व त्यावरून दूध संघापुढे उद्भवलेल्या अडचणी मांडण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळासमोर जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनांबाबतची नाराजी व्यक्त केली. अशीच नाराजी यापूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनीही एका पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केली होती. त्यानंतर शिवाजी पुलाच्या प्रश्नात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्वेगाने आंदोलकांना ‘मी तुम्हाला विमानाची बिझनेस क्लासची तिकिटे काढून देतो; पण तुम्ही दिल्लीला पुरातत्त्व विभागाच्या दारात जाऊन उपोषण करा,’ असे सुनावले होते; परंतु गंमत अशी की, त्याच पालकमंत्र्यांनी व खासदारांनी पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळताच ‘कोल्हापूरचा आणखी एक प्रश्न मार्गी लागला,’ म्हणून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. टोलचा प्रश्न, शिवाजी पुलास पर्यायी पुलाचे रखडलेले काम, अंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी नियुक्ती, कोल्हापूर विकास प्राधिकरण, विमानसेवा, शाळा बंद आंदोलन ही गेल्या काही वर्षांतील यशस्वी आंदोलनाची उदाहरणे आहेत.

कोल्हापूर हा पूर्वापर विरोधकांचा जिल्हा राहिला आहे. या जिल्ह्यास आतापर्यंत कधीचएकमुखी नेतृत्व मिळालेले नाही. त्यामुळे या जिल्ह्याचा जो काही विकास झाला आहे, तो इथल्या लोकांनी स्वत:च्या हिमतीवर सरकारशी संघर्ष करून केला आहे. चांगल्याला चांगलं म्हणण्याचे आणि जिथे चुकते तिथे रस्त्यावर उतरण्याचे आणि विरोधात कितीही मोठा नेता अथवा व्यवस्था असो, त्यास विरोध करण्याचे धाडस इथल्या लाल मातीतल्या माणसाने कायमच दाखविले आहे. त्यामुळेच दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग नेतृत्वालाही कोल्हापूरने दत्तक विधान प्रकरणात वादग्रस्त विधान केल्यावर नमविले होते.

कोल्हापूर नुसते विरोधच करते असे नाही. अनेक चांगल्या गोष्टींना कोल्हापूरने कायमच पाठबळ दिले आहे. कोल्हापूरला चारित्र्यवान लोकांच्या आंदोलनाची उज्ज्वल परंपरा आहे. त्यामुळे चार-दोन फुटकळ आंदोलने कुणी केली व त्याचा तथाकथित त्रास जिल्हाधिकाºयांना झाला म्हणून त्यांनी या आंदोलनाच्या परंपरेची अवहेलना करू नये.

कोल्हापूरला सतत आंदोलने होतात म्हणून विकासाच्या प्रक्रियेत कोल्हापूर मागे राहिले असे वास्तव नाही. जे कोणी बोगस आंदोलन करतात, त्यांचा पर्दाफाश जरूर करावा किंवा समाजानेही अशा आंदोलनांना अजिबात ‘किंमत’ देऊ नये; परंतु, सरसकट आंदोलन म्हणजे चुकीचे किंवा कोल्हापूर म्हणजे बाद अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाऊ नये.विचारांचा प्रभाव : अन्य शहरांमध्ये किंवा राज्यामध्ये लोक अन्याय झाला तर तो मुकाट्याने सहन करतात आणि कोल्हापूर तो सहन करीत नाही. हा इथल्या मातीचा, सामाजिक धाटणीचा, रुजलेल्या विचारांचा आणि पोसलेल्या लोकशाहीचा गुण आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंपPoliticsराजकारण