कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत शिवसेनेलाच बहुमत मिळणार आहे; त्यामुळे शिवसेनेला भाजपबरोबरच्या सत्तेत जाण्याची गरज नाही. सत्तेसाठी कुणाबरोबर हातमिळवणी करायची याचा निर्णय ‘मातोश्री’वर होतो, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे. क्षीरसागर म्हणाले, ‘विधानसभा असो की महापालिकेवेळी असो; युती भाजपने तोडली व ओरड शिवसेनेच्या नावाने केली आहे. विधानसभेनंतरही आमचे पालकमंत्री पाटील यांच्याशी चांगले संबंध होते. त्यांच्याशी आजही कोणतीच दुश्मनी नाही; परंतु त्यांच्या आडून कुणी वार करीत असेल, तर ते सहन करणार नाही. उरला विषय सत्तेत जाण्याचा. सेनेलाच बहुमत मिळणार असल्याने भाजपने आम्हाला सत्तेत घेण्याचा प्रश्नच नाही.’ (प्रतिनिधी)
सत्तेत घेणारे तुम्ही कोण...?
By admin | Updated: November 1, 2015 01:16 IST