शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गुंडाचे तरुणास चाबकाचे फटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:13 IST

कोल्हापूर : खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, दहशत, आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राजेंद्रनगर येथील सराईत गुन्हेगाराने तरुणास गुुरुवारी (दि. ११) भररस्त्यावर चाबकाने मारहाण केली. अक्षय ऊर्फ आकाश वाल्मीक फुलोरे (वय २२, रा. राजेंद्रनगर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी संशयित विश्वनाथ ऊर्फ बिल्डर सौदागर कांबळे (रा. राजेंद्रनगर) याच्यावर राजारामपुरी पोलिसांत गुन्हा ...

कोल्हापूर : खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, दहशत, आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राजेंद्रनगर येथील सराईत गुन्हेगाराने तरुणास गुुरुवारी (दि. ११) भररस्त्यावर चाबकाने मारहाण केली. अक्षय ऊर्फ आकाश वाल्मीक फुलोरे (वय २२, रा. राजेंद्रनगर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी संशयित विश्वनाथ ऊर्फ बिल्डर सौदागर कांबळे (रा. राजेंद्रनगर) याच्यावर राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.अधिक माहिती अशी, अक्षय फुलोरेचा भाऊ रोहित याने बिल्डरच्या बहिणीला पळवून नेले आहे. ते दोघे कुठे लपून बसले आहेत याची माहिती अक्षयला असल्याचे त्याला समजले. गुरुवारी रात्री अक्षय कट्ट्यावर बसला असताना बिल्डर तिथे आला. त्याने रोहित व माझी बहीण कुठे आहेत, अशी विचारणा केली. त्याने मला माहिती नसल्याचे सांगितले. त्याचा राग येऊन बिल्डरने त्याला भररस्त्यावर चाबकाचे फटके पाठीवर, पोटावर मारून जखमी केले.दोनवेळा तडीपारची कारवाईराजेंद्रनगर परिसरात बिल्डर कांबळेची प्रचंड दहशत आहे. लहानपणापासूनच तो गुन्हेगारी क्षेत्रात आहे. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, चाकूहल्ले, धमकावून पैसे काढून घेणे, घरात घुसून मारहाण करणे, महिला, तरुणींची छेडछाड असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. पोलिसांनी एक-दोन वेळा त्याच्यावर तडीपारचीही कारवाई केली आहे.