शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

थोडा तरी शाहू विचार जगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 06:13 IST

केवळ शाहू जयंती साजरी करण्यापेक्षा प्रत्येकाने थोडा-थोडा जरी शाहू विचार जगण्याची भूमिका घेतली तर देशाचे चित्र बदलेल, असा ठाम आशावाद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर : केवळ शाहू जयंती साजरी करण्यापेक्षा प्रत्येकाने थोडा-थोडा जरी शाहू विचार जगण्याची भूमिका घेतली तर देशाचे चित्र बदलेल, असा ठाम आशावाद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केला. येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ भावे यांना शाहू छत्रपती यांच्या हस्ते मंगळवारी प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.गर्दीने खचाखच भरलेल्या शाहू स्मारक सभागृहात हा शानदार समारंभ पार पडला. प्रा. भावे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सर्वांनीच उठून उभे राहून भावे यांच्या कार्याला टाळ्यांच्या गजरामध्ये दाद दिली. ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, विश्वस्त प्रा. अशोक चौसाळकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.देशातील सद्य:स्थितीचा आढावा घेताना पुष्पा भावे म्हणाल्या, सध्या देशभरात घोषित आणीबाणी नसली तरी ती असल्यासारखीच परिस्थिती आहे. मोठ्या पेचप्रसंगातून आपण चाललो आहोत. एका राजकीय गटाच्या ठिकाणी दुसरा गट सत्तेवर आला, एवढ्यापुरते हे मर्यादित नाही; परंतु वंचितांचा, सर्वसामान्यांचा विचार कोण करणार आणि सर्वांसाठी नेतृत्व म्हणून कुणाकडे पाहायचे, हा खरा प्रश्न आहे. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर यांची जी मूल्याधिष्ठित दृष्टी होती, ती अंगी बाणवून आपल्याला यापुढील काळात काम करावे लागेल. त्यांच्या मूल्यदृष्टीकडे अविवेकाने पाहिल्यानेच ही वेळ आली आहे.