शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष, नेत्यांवर टीका करताना दोघांची गोची मंडलिक-महाडिक : वैयक्तिक चिखलफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:59 IST

लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, खासदार धनंजय महाडिक व प्रा. संजय मंडलिक यांना एकमेकांच्या पक्ष व नेत्यांवर टीका करताना मर्यादा येत आहेत. युती झाली तर प्रा. मंडलिक यांच्या व्यासपीठावर भाजपचे नेते असणार तर दोन्ही कॉँग्रेसच्या

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, खासदार धनंजय महाडिक व प्रा. संजय मंडलिक यांना एकमेकांच्या पक्ष व नेत्यांवर टीका करताना मर्यादा येत आहेत. युती झाली तर प्रा. मंडलिक यांच्या व्यासपीठावर भाजपचे नेते असणार तर दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांची अंतर्गत मदत होणार असल्याने ते त्यांच्यावर टीका करू शकत नाहीत. तर गेली साडेचार वर्षे जिल्ह्यातील भाजप नेत्यांशी असलेले जवळचे संबंध त्यामुळे महाडिक भाजप व नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करूच शकत नाहीत. त्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीत व्यक्तिगत उणीदुणी हाच प्रचाराचा मुद्दा राहणार, हे निश्चित आहे.

राष्टवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनाच आघाडीची उमेदवारी मिळणार असल्याने त्यांनी प्रचार सुरू केला आहे. पण त्यांची प्रचाराची पद्धत पाहिली तर ते केंद्र सरकार व नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका करण्यास टाळतात. त्याला कारणेही तशीच आहेत, गेली साडेचार वर्षे जिल्ह्यातील भाजप नेत्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. भीमा कृषी प्रदर्शनात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘धनंजय महाडिक हे आमची मुलगी आहेत, जरी त्यांनी मनाविरुद्ध लग्न केले तरी त्यांच्यावरच प्रेम असणार’ असे वक्तव्य करून भाजप जिल्ह्यात कोणाला मदत करणार हे त्यांनी जाहीरच केले. त्यामुळे महाडिक हे भाजप व नरेंद्र मोदी यांच्यावर आक्रमक होण्याची शक्यता कमी असून, त्यांचा प्रचाराचा रोख संजय मंडलिक यांच्यावरच राहणार आहे.संजय मंडलिक हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. पण गेल्या तीन-चार वर्षांपासून ते कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या नेत्याच्या जवळ गेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी दोन्ही काँग्रेसला उघड मदत करण्याची भूमिका घेऊन लोकसभेसाठी ‘सॉफ्ट कॉर्नर’चा प्रयत्न आहे. कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी तर मंडलिक यांना उघड मदत करण्याची घोषणा केली आहे; तर राष्टÑवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचा मंडलिक यांनाच उमेदवारी देण्याचा प्रयत्न राहिला. यामध्ये कागल विधानसभेचे राजकारण दडले असले तरी महाडिक यांचे पक्षांतर्गत राजकारणही कारणीभूत आहे. यामुळे मंडलिक थेट कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या नेत्यांवर टीकाटिपणी करण्यास टाळाटाळ करीत

टॅग्स :Dhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapurकोल्हापूर