शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सत्ता कुणाची?

By admin | Updated: February 23, 2017 00:49 IST

उत्सुकता शिगेला; दुपारी चारपर्यंत चित्र होणार स्पष्ट

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीची सत्ता नेमकी कुणाकडे याचा फैसला आज, गुरुवारी होणार आहे. मंगळवारी ईर्ष्येने ७७ टक्के मतदान झाल्यानंतर आता सर्वच उमेदवारांच्या ‘उरात होतंय धडधड’ अशी अवस्था झाली असून, आज, गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत निकालाचे सर्व चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरच राजकीय हालचाली वेगावणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ६७ आणि पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी ९०५ उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी (दि. २१) मतदान यंत्रांमध्ये बंदिस्त झाले. अतिशय अटीतटीने आणि ईर्ष्येने सरासरी ७७ टक्के मतदान झाले. आज, गुरुवारी सकाळी दहापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि नोडल आॅफिसर विवेक आगवणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. सकाळी दहा वाजता सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात येईल व ती जाहीरही करण्यात येईल. मतमोजणीसाठी एकूण सातशे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानंतर मग गटनिहाय मतमोजणीला सुरुवात होणार आहे. गगनबावडा तालुक्यात दोनच गट असल्याने येथील निकाल दुपारी बारापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. पन्हाळा वगळता अन्य सर्व तालुक्यांमध्ये एकेका गटाची मतमोजणी होणार आहे. सुरुवातीला एक गट घेतला जाईल. सर्व केंद्रांची मतदान यंत्रे त्या टेबलांवर घेतली जातील आणि त्यांची मोेजणी होईल. यानंतर गणांची मतदान यंत्रे घेऊन त्याच टेबलांवर गणांचीही मोजणी होईल. एका गटाची आणि त्या अंतर्गतच्या दोन गणांची मोजणी झाल्यानंतर त्या गटातील प्रतिनिधींना बाहेर पाठवून दुसऱ्या गटाच्या प्रतिनिधींना मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाईल. त्यानंतर दुसऱ्या गटाची मोजणी सुरू होणार आहे..........................मतमोजणीसाठीची टेबलांची संख्याअ. नं. तालुकाटेबल्सची संख्या१करवीर३५२गगनबावडा१२३पन्हाळा२४४शाहूवाडी२५५राधानगरी२१६कागल२४७हातकणंगले२४८शिरोळ१९९भुदरगड२७१०चंदगड१२११आजरा१६१२गडहिंग्लज३४..................................एकूण२७३-------------------२२0२२0१७-कोल-बंदोबस्तरमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये करवीर तालुक्यातील मतदान यंत्रे ठेवण्यात आली असून तेथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.