शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

यड्रावात कधी वाहणार विकासाचे वारे

By admin | Updated: September 24, 2015 00:04 IST

नागरी सुविधांची वानवा : आरोग्य, पाणी, मनोरंजन, शैक्षणिक यासह विविध सोयींची आवश्यकता--मोठ्या गावांच्या मोठ्या समस्या

घन:शाम कुंभार- यड्राव--इचलकरंजी शहराचा झपाट्याने चेहरा-मोहरा बदलत आहे. शहरालगत असलेले परंतु शिरोळ तालुका असूनही इचलकरंजीचा अविभाज्य बनत असलेल्या यड्राव गावास शासकीय योजना, सामाजिक हिताचे उपक्रम व सर्वसामान्य नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यास परिसरास विकासाची बळकटी मिळू शकेल आणि ग्रामीण भागातही नागरी सुविधा मिळू शकल्याने शहरालगतच्या ग्रामीण भागाचा कायापालट होईल.यड्राव गाव हे शिरोळ तालुक्यात असले तरी सर्वसामान्य ग्रामस्थांच्या आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक, औद्योगिक, सामाजिक या सर्वच गोष्टींबाबत आवश्यक त्या सोयी-सुविधा व त्याच्या उपाययोजनांसाठी इचलकरंजी शहरावर अवलंबून रहावे लागते. ग्रामीण व शेतीपूरक उद्योग व्यवसाय असल्याने शहरासाठी आवश्यक असणारा दूध पुरवठा, भाजीपाला, उद्योगामधील कामगारांची आवश्यकता यासह अनेक सुविधांचा पुरवठा येथून होतो. यामुळे परस्परपुरक ठरलेले यड्राव-इचलकरंजी शहर येथील सर्वसामान्यांच्या गरजा व सोयी-सुविधांपेक्षा कितीतरी पुढे आहे. इचलकरंजी-टाकवडे, जांभळी, कोंडीग्रे, तारदाळ, खोतवाडी व शहापूर या सीमारेषेच्या आतील सुमारे तीन कि.मी. परिसरात पसरलेल्या या क्षेत्रात सुमारे बारा हजार लोकसंख्या आहे. मुख्य गावाभोवती औद्योगिकीकरणामुळे विस्तारित वसाहती स्थापन होत आहेत. या वसाहतींना शहरी ढग दिसून येत आहेत.गावातील या लोकसंख्येला आरोग्य, पाणी, मनोरंजन, शैक्षणिक यासह विविध सोयींची आवश्यकता आहे. ग्रामस्थांना शुद्ध पेयजल, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा निर्मूलन, सार्वजनिक शौचालय, मुलांना खेळासाठी मैदान, वाचनालय, वृद्धांसाठी आॅक्सिजन पार्क, सर्व भागात दिवाबत्तीची सोय, गावांतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, गावाचा विस्तार वाढत असल्याने स्मशानभूमीची सोय, मळे भागातून येणारा शेती उत्पादनासाठी पाणंद रस्ते तयार करणे, सर्वोपयोगी सांस्कृतिक भवन व झाडे जगविण्यासाठी प्रोत्साहन, व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन, दारूबंदीसाठी पुढाकार, सर्वसोयीनियुक्त बाजारकट्टा या सुविधांची अत्यावश्यकता आहे.याचबरोबर यड्रावच्या दक्षिणेस असलेला इचलकरंजीचा कचरा डेपो, मल:निस्सारण केंद्रामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर. के. नगर, रेणुकानगर, खंडोबावाडी या भागात अपार्टमेंट संस्कृती जोर धरत आहे. परंतु त्याचा सांडपाणी व्यवस्थापनाशी काहीही संबंध येत नसलेले सांडपाणीच एक मोठा प्रश्न बनत आहे. ग्रामीण भागात शौचालयाबाबत अजून प्रबोधनाची गरज आहे. यड्रावमधील शाळेजवळ असलेल्या गावतळ्याची डागडुजी करून नैसर्गिक पाणीसाठा जनावरे व इतर उपयोगासाठी पूरक ठरला असता. त्याच्याभोवती सुशोभिकरण झाल्यास धावपटूंसाठी धावपट्टी तयार होऊ शकते. जवळच असलेल्या स्मशानभूमीस कंपाऊंड घालूनही सोय करता येईल. मार्गावरील अतिक्रमणे बाजूला करणे वाहतुकीच्यादृष्टीने हितकारक आहे.इचलकरंजी आमराईच्या पूर्वेकडून आसरानगर पार्वती हौसिंग सोसायटी, अल्फोन्सा स्कूल, पार्वती औद्योगिक वसाहत असा प्रस्तावित ८० फुटी बायपास रोड आहे. यामध्ये असणारे शेतकरी व जमीनमालकांनी मार्गासाठी शासनास सहकार्य केल्यास इचलकरंजीतील प्रमुख मार्गांवरील रहदारीचा ताण निश्चित कमी होईल. यामुळे अपघातांची संख्या रोडावेल.गावासाठी स्वच्छ पाणी मिळावे. शासनाकडून मोफत मिळत असलेले मीटर बसवून ग्रामस्थांचा फायदा करावा. ग्रामस्थांना आर्थिक बोजा देऊ नये. तळ्याचे सुशोभीकरण करून खेळाडूंसाठी धावपट्टी करावी. इचलकरंजीचा कचरा डेपो हलवावा. डुकरांचा बंदोबस्त करावा. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत. अतिक्रमणे दूर करावीत.- राजगोंडा पाटील, ग्रामस्थ.इचलकरंजीवर अवलंबूनयड्राव गाव शिरोळ तालुक्यात असले तरी ग्रामस्थांच्या आरोग्य, शिक्षण, औद्योगिक, सामाजिक या सर्वच गोष्टींबाबत आवश्यक त्या सोयी-सुविधा व त्याच्या उपाययोजनांसाठी इचलकरंजीवर अवलंबून रहावे लागते.