शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाचे ७0 हजार कोटी गेले कुठे?: मुख्यमंत्री

By admin | Updated: February 17, 2017 00:19 IST

चोरांच्या हाती झेडपी देऊ नका : कवलापुरातील प्रचारसभेत आवाहन

सांगली : कमी पैशात जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे काम आमच्या सरकारने केले. मागच्या सरकारने ७0 हजार कोटी रुपये खर्च करूनही सिंचन होऊ शकले नाही. हे पैसे गेले कुठे, असा सवाल करतानाच, अशा चोरांच्या हाती जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कवलापूर (ता. मिरज) येथील प्रचार सभेत केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ कवलापुरात सभा पार पडली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, लोकांनी मतदान विचारपूर्वक करावे. लोकांनी त्यांच्या मतांचे डिपॉझिट आमच्या बँकेत ठेवल्यास त्यांना आम्ही दामदुप्पट मोबदला देऊ. आमच्या बँकांना सोन्या-चांदीची दारे नाहीत. दिसायलाही आमच्या बँका फारशा चांगल्या नाहीत. तरीही आमचा कारभार चांगला आहे. दुसरीकडे राहुल गांधी, अजित पवार आणि पतंगराव कदम यांच्यासारख्या नेत्यांच्या राजकीय बँका दिवाळखोरीत निघाल्या आहेत. त्यामुळे लोकांना व्याज तर सोडाच, त्यांच्या ठेवीसुद्धा परत मिळणार नाहीत. त्यामुळे शासनाच्या योजनांची योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा कारभार चांगला होणे गरजेचे आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांची सूत्रे भाजपकडे सोपविल्यास लोकांना त्याचा फायदा होईल. सिंचनाबाबत सरकारने काळजीपूर्वक काम केले आहे. एकट्या सांगली जिल्ह्यातच ४३ हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आणण्याचे काम भाजपने केले. रब्बीचा पेराही राज्यात वाढला आहे. केवळ तीन हजार कोटी रुपयांमध्ये राज्यातील १३ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे. मागील सरकारने ७0 हजार कोटी खर्च करूनही ते सिंचन करू शकले नाहीत. त्यांनी सत्तेचा वापर स्वत:साठी केला. जनतेसाठी त्यांनी काहीच केले नाही. सिंचनामध्ये सरकार आमूलाग्र बदल घडविण्याच्या तयारीत आहे. यापुढे ऊस पाटाच्या पाण्यावर नव्हे, तर ठिबक सिंचनावर तयार होईल. अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी सध्या येत आहेत. त्यामुळे गटशेतीचा पर्याय काढून त्याच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी योजना तयार करण्याचा पर्याय आमच्यासमोर आहे. शेतीमधील यांत्रिकीकरणासाठीही भर देण्यात येईल. यापूर्वी गरिबांपर्यंत कोणत्याही योजना पोहोचत नव्हत्या. दारिद्र्यरेषेखालील यादीत गरिबाचे नाव नसायचे, पण सावकाराचे हमखास असायचे. या गोष्टी लक्षात आल्यामुळेच आम्ही आवास योजनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. आमची योजना म्हणजे आघाडी सरकारची इंदिरा आवास योजना नव्हे. त्यातल्या घरांचे वाटप नेत्याच्या शिफारसीवरून होत होते. आता असे प्रकार अजिबात होत नाहीत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे प्रस्थापित नेत्यांनी दाबून ठेवलेला पैसा बॅँकेत जमा झाला आहे. त्यामुळेच मुद्रा योजनेसह अनेक योजनांच्या माध्यमातून सामान्य लोकांसाठी जादा निधीची तरतूद होऊ शकली, असे ते म्हणाले. यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, दिनकर पाटील, रमेश शेंडगे, गोपीचंद पडळकर, शिवाजी डोंगरे, शेखर इनामदार, दीपक शिंदे, नगरसेविका स्वरदा केळकर, राजाराम गरुड, मुन्ना कुरणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)झंझट आम्हाला संपवायचेच आहे!प्रत्येकवर्षी सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांच्या वीज बिलाचा प्रश्न माझ्याकडे येतो. बिलाएवढे पैसे जमा होत नाहीत आणि सरकारला त्याशिवाय योजना सुरू करता येत नाहीत. त्यामुळे हे झंझट आम्हाला एकदाचे संपवायचे आहे.शेतकऱ्यांना कोणताही त्रास न होता याबाबतचा तोडगा काढण्यात येईल. सौरऊर्जेचा वापर करून सिंचन योजनांच्या वीज बिलाचा त्रासही कमी करायचा आहे. नक्कीच यातून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.वीज बिलाचा प्रश्न सोडवा...संजयकाका पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या योजनांच्या वीज बिलाचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. आम्हाला जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांशी लढायचे आहे. त्यामुळे वीज बिलाचा प्रश्न कायमचा सोडविण्यात यावा.भाषणबाजीला लगाममुख्यमंत्री व्यासपीठावर आल्यानंतर संयोजकांनी महत्त्वाच्या नेत्यांच्या भाषणांचे नियोजन केले होते. यामध्ये चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, आ. सुरेश खाडे व अन्य काही लोकांच्या भाषणांचा समावेश होता; मात्र मुख्यमंत्र्यांना नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशीर झाल्याने त्यांनी सर्व भाषणे रद्द केली. संजयकाकांनी सिंचनाचा प्रश्न मांडून भाषण आटोपते घेतले आणि त्यानंतर थेट फडणवीस यांनीच ध्वनिक्षेपक हातात घेतला.