शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 कष्टकरी जनतेचा आवाज आहे कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:46 IST

वसंत भोसले । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्रात सतराव्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख लढत दोन आघाड्यांमध्येच आहे. एके काळी ...

वसंत भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्रात सतराव्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख लढत दोन आघाड्यांमध्येच आहे. एके काळी अनेक मतदारसंघांत समाजवादी, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, तसेच जनता दल यांची लढत लक्षवेधी असायची. या पक्षांचे नेते शेतकरी, कामगार आणि कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे म्हणून तळपत असायचे. प्रथमच महाराष्ट्राच्या राजकारणातून समाजवादी आणि डावे पक्ष निवडणुकीच्या लढाईत कोठेही आघाडीवर नाहीत, असे स्पष्ट दिसते आहे.महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यातच प्रमुख लढत आहे. तिसरी शक्ती नाहीच. अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित विकास आघाडीने या चारही पक्षांच्या दोन्ही गटाविरुद्ध तिसरी शक्ती उभारण्याचा प्रयत्न केला आहे. या आघाडीची पहिलीच निवडणूक आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेने लोकसभा न लढविता भाजप-शिवसेना युती विरुद्ध प्रचार करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.प्रजा समाजवादी पक्ष, संयुक्त समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष, कामगार आघाडी शेड्युल कास्ट फेडरेशन आदी पक्षांतर्फे अनेक दिग्गज उमेदवारांनी महाराष्ट्रातून निवडणुका लढविल्या आहेत, तसेच त्या जिंकून लोकसभेत राष्ट्रीय नेत्यांच्या माळेत जाऊन बसले आहेत.डाव्या आघाडीच्या किंवा समाजवादी पक्षांच्या नेत्यांची पार्श्वभूमी ही शेतकरी, कामगार तसेच कष्टकरी समाजाच्या हक्कासाठी नेहमी असायची. श्रीपाद अृमत डांगे, जॉर्ज फर्नांडिस, दत्ता सामंत, मृणाल गोरे, अहिल्याबाई रांगणेकर यांनी मुंबईत कामगार चळवळीच्या माध्यमातून राजकारण करीत लोकसभेत पाऊल टाकले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे सातारा आणि बीडमधून लोकसभेवर प्रतिनिधित्व केले होते. ना. ग. गोरे आणि एस. एम. जोशी या ज्येष्ठ समाजवादी मंडळींनी पुण्याचे प्रतिनिधित्व केले होते. सध्याच्या पालघर आणि पूर्वीचा डहाणू मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा दबदबा होता. लहानू कोम यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले.रायगड लोकसभा मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला होता. गेल्या पंधरा निवडणुकांमध्ये आघाडीवरचा पक्ष म्हणून शेकापकडे पाहिले जात होते. दि. बा. पाटील यांच्यासह अनेकांनी तेथून प्रतिनिधित्व केले. माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या विरोधातील निवडणुका गाजल्या आहेत. कोकणात पूर्वीचा राजापूर मतदारसंघ हा समाजवाद्यांचा बालेकिल्लाच होता. बॅ. नाथ पै आणि मधू दंडवते यांनी सलग दहा वेळा प्रतिनिधित्व केले आहे. मराठवाड्यातही शेकापचा परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद, आदी मतदारसंघांत दबदबा होता. विदर्भात फॉरवर्ड ब्लॉकतर्फे जांबूवंतराव धोटे नागपूरमधून एकदा निवडून आले होते. वर्ध्यातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत साठे यांच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामचंद्र घृंगारे यांनी अनेक वेळा लढत दिली. एकदा त्यांनी वसंत साठे यांचा पराभवही केला होता.या निवडणुकीत माकपतर्फे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघातून आमदार के. सी. पडवी निवडणूक लढवित आहेत. हा अपवाद वगळता एकाही मतदारसंघातून समाजवादी किंवा डाव्या चळवळीतील उमेदवार नाहीत.वंचित आघाडी व शेट्टीयुती आणि आघाडी वगळता अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित विकास आघाडीत काही उमेदवार विविध चळवळीशी संबंधित आहेत. स्वत: आंबेडकर अकोला आणि सोलापुरातून निवडणूक लढवित आहेत.याउलट रिपब्लिकन पक्षांच्या एकाही गटाला युती किंवा आघाडीने उमेदवारी दिलेली नाही. शेतकरी चळवळीतून निर्माण झालेले नेतृत्व राजू शेट्टी यांचा एकमेव अपवाद आहे, अन्यथा कोणत्याही चळवळी किंवा संघटनेचे प्रतिनिधी शर्यतीत नाहीत.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे, कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस, क्रांतिसिंह नाना पाटील, आपल्या अभ्यासू संसदीय कार्याने गाजलेले प्रजा समाजवादी पक्षाचे बॅ. नाथ पै, शेतकरी कामगार पक्षाचे दि. बा. पाटील, केशवराव धोंडगे, समाजवादी नेते एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मृणाल गोरे, प्रमिलाताई दंडवते, भाई उद्धवराव पाटील, प्रा. मधू दंडवते, बापू काळदाते, रामचंद्र श्रृंगारे, श्यामराव परुळेकर, लहानू कोम, आनंदराव चव्हाण, डॉ. दत्ता सामंत, अहिल्याबाई रांगणेकर, भाऊराव गायकवाड आदी दिग्गज महाराष्ट्रातून निवडून येत होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक