शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

सरकारपुढे घासून घासून उध्दव यांना नाक कुठे राहिलेय : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 17:21 IST

उध्दव ठाकरे यांना राजकारण कळत का, कोणत्याही खात्याची त्यांना माहिती नाही. सरकारसोबत पटत नसेल तर घटस्फोट घ्या, सत्तेत तीन वर्षे नाक घासत घासत काढल्यामुळे उध्दव यांना नाक कुठे राहिले आहे, अशा शब्दात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कोल्हापूरात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.

ठळक मुद्देलोकसभा, विधानसभा लढविणार शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकणार संपूर्ण महाराष्ट्रच माझा बालेकिल्ला मी नेहमीच जनतेसोबत

कोल्हापूर : उध्दव ठाकरे यांना राजकारण कळत का, कोणत्याही खात्याची त्यांना माहिती नाही. सरकारसोबत पटत नसेल तर घटस्फोट घ्या, सत्तेत तीन वर्षे नाक घासत घासत काढल्यामुळे उध्दव यांना नाक कुठे राहिले आहे, अशा शब्दात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कोल्हापूरात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.नारायण राणे पक्ष स्थापनेनंतर प्रथमच राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा कोल्हापूरातून सुरु झाला. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. या परिषदेत राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे, त्यापासून शिवसेना काही बोध घेणार का, अशी थेट टीका राणे यांनी उध्दव यांच्यावर केली. सत्तेत रहायचे आणि पंतप्रधानापासून मु्ख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांवर टीका करायची. आता केवळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरच टीका करायची बाकी आहे. इतकेच नाराज आहात तर बाहेर का पडत नाही असा सवाल करत राणे म्हणाले, उध्दव सत्तेतून बाहेर पडले, तर त्यांचे दुकान बंद पडेल, अशी खोचक टीका केली.कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहाही जागा शून्यावर आणीन, असे सांगतानाच राणे यांनी शिवसेनेचे नामोनिशाण राहणार नाही, पण शिवसेनेच्या विद्यमान आमदारांचे नुकसान करणार नाही. त्यांची आमदारकी त्यांना मिळेल, फक्त ती कोणत्या पक्षाची असेल, हे तुमचे तुम्हीच ओळखा, असेही राणे म्हणाले.केवळ सिंधुदुर्गच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र माझा बालेकिल्ला आहे. मी मुख्यमंत्री असताना जे चांगले निर्णय घेतले, त्या बळावरच जनता मला पाठिंबा देत आहे. कोल्हापूरच नव्हे तर गडचिरोलीतही माझी जादू चालते, अशा शब्दात नारायण राणे यांनी विरोधकांना टोला लगावला. सध्या माझ्या पक्षात जो येईल, त्याला घेण्याचे धोरण नाही. मग माझ्या आणि इतर पक्षात काय फरक राहिला असा सवालही त्यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.पक्षात आता घेउन नीतेश आणि नीलेश या दोन्ही मुलांची कारकीर्द मी संपविणार नाही. त्यांचा राजीनामा हा त्यांचे नुकसान करणारा ठरेल. कारकीर्द पूर्ण झाली की ते पक्षात येतील असे सांगत राणे यांनी मंत्रीपदाबद्दल थोडी वाट पहा असे भाष्य केले.सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करणार नाही, असे सांगून राणे म्हणाले, मी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हावी बाळासाहेबांवर टीका केली नव्हती, असे सांगितले.गुजरातमध्ये भाजप सरकारला प्रतिसाद मिळत आहे, असे सांगत असतानाच सध्या भाजपविरोधात नाराजी आहे, मग तुमचे धोरण काय असणार, असे पत्रकारांनी विचारताच जर जनता भाजपच्या विरोधात असेल तर आम्ही जनतेसोबत असू, असे राणे म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे kolhapurकोल्हापूर