शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

जनतेच्या सेवेत कुठे कमी पडलो ?

By admin | Updated: January 14, 2015 01:27 IST

सतेज पाटील यांचा सवाल : लाट इतरत्र का दिसली नाही; कार्यकर्त्यांचा मेळावा

कोल्हापूर : पंधरा वर्षे व्यवसायावर पाणी सोडले, संसार म्हटला नाही, जनतेच्या सुख-दु:खात सहभागी झालो. मागेल तेवढा निधी दिला, तरीही पराभव झाला. मी कुठे चुकलो, लाट होती तर इतर मतदारसंघांत कशी दिसली नाही, जनतेची सेवा करण्यात कुठे कमी पडलो, असे भावनिक सवाल माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. वॉटरपार्क येथे आज, मंगळवारी पाटील याच्ंया कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. विधानसभेतील पराभवानंतर हा पहिलाच मेळावा असल्याने कार्यकर्त्यांची तोबा गर्दी झाली होती. इंदिरा गांधींपासून विलासराव देशमुख यांच्यापर्यंतच्या दिग्गजांचा पराभव झाला होता. त्यातून उभारी घेत ते सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले. त्यामुळे पराभवाने खचून न जाता, सार्वजनिक कामाबरोबर वैयक्तिक कामांकडे लक्ष द्या, असे जयराम पाटील यांनी सांगितले. यावेळी पी. डी. पाटील, भरत रसाळे, निवास पाटील, आर. जी. जाधव, सचिन चव्हाण, बजरंग पाटील, बाबूराव गुरबे, बी. एम. पाटील, उमेश आपटे, मधुकर देसाई, विश्वास नेजदार यांनी मनोगत व्यक्त केले. सतेज पाटील म्हणाले, गेले पंधरा वर्षे घरदार, व्यवसाय सोडून जनतेसाठी काम केले. २००९ ला मतदारसंघात नवखा होतो, त्यावेळी पराभव झाला असता तर मान्य केला असता. पाच वर्षे काम केले, संपर्क ठेवला, प्रश्न सोडविले मग चुकलो कुठे, त्यामुळे अनेक वेळा संयमाचा बांध फुटतो. पुन्हा काम करण्याची मानसिकता होत नाही. पूर्वी दहा गावे एका दमात करत होतो, आता चार गावे करू वाटत नाहीत. कंदलगावात गेलो असता प्रत्येक उंबऱ्यावर माझे स्वागत करण्यात आले. उचगावमध्ये दहा कोटींची कामे केली, लक्षतीर्थमध्ये प्रॉपर्टी कार्डे दिली, मग चुकले कुठे? मोरेवाडीत सतत संपर्क ठेवत पाणीप्रश्न संपविला, उजळाईवाडीतही कमी मतदान झाले, हे गणित कळले नाही. भावाची व पत्नीची साथ मिळाल्याने पूर्णवेळ राजकारण केले. कार्यकर्त्यांना दोष देणार नाही, माझे काहीतरी चुकले असेल, अशी मनाची समजूत घालत आहे. आता सक्रिय व्हावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पण ताकदीने मागे उभे राहणार असाल तर सक्रिय होतो, असेही पाटील यांनी बजावले. ‘गोकुळ’ चे संचालक बाबासाहेब चौगले, ऋतुराज पाटील, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष संजय खोत, प्रा. जयंत आसगांवकर, डी. आर. पाटील, उपमहापौर मोहन गोंजारे, पूनम जाधव उपस्थित होते. कानाजवळच्यापासून सावध राहाआपल्या जवळील अनेक कार्यकर्त्यांना आपणच मंत्री झाल्यासारखे वाटत होते. त्यांनी खाली बघितलेच नाही, त्यामुळेच फटका बसल्याचे किरणसिंह पाटील यांनी सांगितले. सशाच्या शिकारीला जाताना वाघाचे साहित्य घेऊन तुम्ही जाता, पण कानाजवळच्या माणसांपासून थोडे सावध राहा, असे सूचक वक्तव्य अशोक पाटील-चुयेकर यांनी केल्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. ‘चंदगड’मधून आॅफर‘चंदगड’मधून उभे राहा, आतापासून तुमच्यासाठी कामाला लागतो. तुम्हाला आमदार नाही केले तर बिंदू चौकात आम्हाला गोळ्या घाला, असे पी. डी. पाटील व बाबूराव गुरबे यांनी सांगितले. आजही अंग थरथरते..!सर्व काही सोडून जनतेसाठी अहोरात्र झटलो, पण पराभव पत्करावा लागला. सकाळी दोन तास व रात्री एक तास राजकारण करणारा मी नाही, विश्वासाने कामे केली तिथेच अडचणीत आलो. मेळाव्यातील भाषणे ऐकताना माझे अंग आजही थरथरते, असे पाटील यांनी सांगताच अनेकांचे डोळे पाणावले.