शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुठं आहेत राष्ट्रवादीचे नगरसेवक; शरद पवारांचा ‘पारा’ चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 01:10 IST

कोल्हापूर : आर. के. पोवार, कुठं आहेत राष्ट्रवादीचे नगरसेवक..? अशी विचारणा खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच शुक्रवारी सकाळी शहराध्यक्षांना ...

कोल्हापूर : आर. के. पोवार, कुठं आहेत राष्ट्रवादीचे नगरसेवक..? अशी विचारणा खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच शुक्रवारी सकाळी शहराध्यक्षांना केली. निवडणूक अखेरच्या टप्प्यात आली असतानाही पक्षाचेच नगरसेवक अजूनही प्रचारात सक्रिय न झाल्याचा राग पवार यांनी व्यक्त केला.पवार थांबलेल्या हॉटेलच्या रुममध्ये आर. के. पोवार त्यांना भेटायला गेल्यावर पत्रकारांच्यासमोरच ही विचारणा केली. यावेळी आर. के. यांनी नगरसेवक आपापल्या भागात प्रचारात सक्रिय झाले आहेत असे सांगण्याचा प्रयत्न केला परंतु पवार यांचे त्याने समाधन झाले नाही. चार-पाच नगरसेवकच पक्षाचे काम करत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर शरद पवार यांनी त्यांची यादी करा व ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवून त्यांना नोटीस काढा, अशा सूचना केल्या. त्यावर आर. के. यांनी तशी नावे कळवितो, असे भीत भीत सांगितले. शुक्रवारी सकाळी आठ वाजताच धनंजय महाडिक, व्ही. बी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, अनिल साळोखे, ही सर्व मंडळी हॉटेलवर आली. दरम्यान, तासाभराने श्रीपतराव शिंदे यांनी पवार थांबलेल्या खोलीमध्ये त्यांची भेट घेतली. यावेळी गडहिंग्लज जनता दलाचे अध्यक्ष उदय कदम उपस्थित होते. याचवेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, कणकवलीचे उपनगराध्यक्ष अबीद नाईक, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पवार यांची सदिच्छा भेट घेतली.येथील मार्केट यार्डमधील शाहूवाडीचे वस्ताद रंगनाथ ठाणेकर यांनीही पवार यांची भेट घेतली. पवार यांनी बारामतीमध्ये कुस्ती लावल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.हरियाणाहून कार्यकर्ते : महाडिक यांचे मित्र असलेले मनजित आणि त्यांचे पैलवान सहकारी प्रचारासाठी कोल्हापुरात आले आहेत. या हरियाणाच्या मित्रपरिवाराने यावेळी महाडिक आणि पवार यांची भेट घेतली.श्रीपतराव शिंदे भेटले; परंतु पाठिंब्याचा निर्णय नाहीपवार यांची भेट घेऊन परत जाताना श्रीपतराव शिंदे म्हणाले, ‘साहेब फार त्रास झालाय आम्हाला’. समोर पत्रकार असल्याचे पाहून पवार यांनी त्यांना थांबविले. आता यांच्यासमोर नको, असे सांगितले. गेल्या पाच वर्षांत कारखान्याबाबत झालेल्या त्रासाबद्दलच शिंदे यांनी पवार यांच्याकडे तक्रार केल्याचे समजते.४दरम्यान, पवार यांना भेटल्यानंतर शिंदे यांना पाठिंब्याबाबत विचारले असता, ‘काय ते साहेबांनाच विचारा’ असे सांगून शिंदे बाहेर पडले. दरम्यान सायंकाळी खासदार महाडिक यांच्या प्रचार यंत्रणेकडून शिंदे यांनी पाठिंबा दिला असल्याचे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले. त्याबद्दल शिंदे यांच्याकडे पुन्हा विचारणा केल्यावर त्यांनी पवार यांची भेट झाली परंतु आम्ही अजून पाठिंब्याचा निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले.