शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

जेव्हा निवासी उपजिल्हाधिकारीच सोडतात दुचाकींची हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:44 IST

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ‘नो पार्किंग’मध्ये लावलेल्या दुचाकींची हवा  अचानक निवासी उप जिल्हाधिकारी संजय शिंदे व कर्मचाऱ्याकडून सोडण्यात ...

ठळक मुद्दे‘नो पार्किंग’मध्ये वाहने लावल्याने थेट कारवाई वाहनधारकांची तारांबळ : जिल्हाधिकारी कार्यालयातील चित्र

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ‘नो पार्किंग’मध्ये लावलेल्या दुचाकींची हवा  अचानक निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व कर्मचाऱ्याकडून सोडण्यात आली. वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी त्यांच्याकडून थेट कारवाई झाल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. ज्यांच्या दुचाकींमधील हवा गेली, त्यांना त्या ढकलत नेण्याची वेळ आली.काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिथे रिकामी जागा दिसेल तिथे वाहने लावल्याचे चित्र होते. ही वाहनेही अस्ताव्यस्त पद्धतीने लावली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन हॉर्नचा कर्कश आवाज यायचा. यामुळे कार्यालयीन कामात व्यस्त असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास व्हायचा.

याबाबत वाहतूक नियंत्रण शाखेला कळविल्यानंतर अनेक वेळा त्यांच्याकडून वाहने उचलून नेण्याची कारवाई करण्यात आली; परंतु काही दिवसांनंतर पुन्हा तेच अस्ताव्यस्त चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने पार्किंगचे झोन करण्यात आले. यामध्ये चारचाकी वाहने, दुचाकी वाहने, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांची वाहने यांच्यासाठी ठिकाणे निश्चित करण्यात आली. त्यानुसार वाहने पार्किंग करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली.

यावर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या ड्यूटी लावण्यात आली. त्यानंतर वाहनांच्या पार्किंगबाबत बऱ्यापैकी शिस्त लागली होती; परंतु गेल्या काही दिवसांपासून ‘नो पार्किंग’मध्येच दुचाकी दिसू लागल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यानीच कानाडोळा केल्याने हे चित्र दिसू लागले. अचानक निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला सोबत घेऊन खिशातील किल्लीने थेट दुचाकींच्या हवा सोडायला सुरुवात केली.

अचानक झालेल्या या प्रकाराने वाहनधारकांची तारांबळ उडाली. ‘नो पार्किंग’चे फलक लावूनही वाहने लावल्याबद्दल हवा सोडण्याची थेट कारवाई निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली. त्यांच्या या कारवाईच्या धसक्याने वाहनधारक पार्किंगचे फलक पाहूनच वाहने लावत होते. तसेच ज्यांच्या दुचाकीची हवा गेली, त्यांना दुचाकी ढकलतच पायपीट करावी लागली.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीTrafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर