शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कधी मिळणार ‘सुवर्ण महोत्सवी’ निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:27 IST

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाला सुवर्णमहोत्सवी निधीपैकी ५ कोटी ५६ लाख रुपये आतापर्यंत मिळाले आहेत. उर्वरित ३९ कोटी ४४ लाख रुपये राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. विद्यापीठाने या निधीच्या मागणीचे प्रस्ताव शासनाला वारंवार पाठविले. मात्र, ‘लवकरच निधी मिळेल’ या आश्वासनाशिवाय विद्यापीठाच्या पदरात काहीच पडलेले नाही. विद्यापीठ परिसरातील भुयारी मार्ग आणि सांगली, साताऱ्यातील ...

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाला सुवर्णमहोत्सवी निधीपैकी ५ कोटी ५६ लाख रुपये आतापर्यंत मिळाले आहेत. उर्वरित ३९ कोटी ४४ लाख रुपये राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. विद्यापीठाने या निधीच्या मागणीचे प्रस्ताव शासनाला वारंवार पाठविले. मात्र, ‘लवकरच निधी मिळेल’ या आश्वासनाशिवाय विद्यापीठाच्या पदरात काहीच पडलेले नाही. विद्यापीठ परिसरातील भुयारी मार्ग आणि सांगली, साताऱ्यातील उपकेंद्रांचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.विद्यापीठातील स्कूल आॅफ नॅनोसायन्स विभागात आज, सोमवारी सकाळी दहा वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि विद्यापीठ प्रशासनातील अधिकारी यांची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे शासनदरबारी प्रलंबित असलेल्या काही प्रमुख प्रश्नांचा ‘लोकमत’ने आढावा घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने २०११ मध्ये विद्यापीठाला सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ४५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. या निधीपैकी ५ कोटी ५६ लाख रुपये आतापर्यंत विद्यापीठाला मिळाले. हा निधी पूर्णपणे मिळविण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. निधी मिळेल या अपेक्षेने विद्यापीठाने स्वनिधीतून स्कूल आॅफ नॅनोसायन्स अ‍ॅँड टेक्नॉलॉजी, यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंट, आदी उपक्रम सुरू केले. मात्र, प्रस्तावानुसार अपेक्षित निधी मिळाला नसल्याने हे उपक्रम संथगतीने सुरू आहेत.दरम्यान, सांगली, सातारा जिल्ह्णातील विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी या जिल्ह्णात विद्यापीठाने उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेतला. त्यासाठी जागेच्या मागणीचा प्रस्ताव विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी शासनाला सादर केला. त्यावर कार्यवाही झाली नसल्याने संबंधित उपकेंद्रे रखडली आहेत. विद्यापीठाने विद्यार्थी, कर्मचाºयांच्या सुरक्षिततेसाठी विद्यापीठातील ग्रंथालय ते शाहू संशोधन केंद्र असा भुयारी मार्ग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सुमारे आठ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव विद्यापीठाने शासनाला सादर केला आहे. त्यावरही पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही.पालकमंत्र्यांकडून मदतीची अपेक्षाकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या १९ जून २०१५ रोजी झालेल्या स्वागतावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुवर्णमहोत्सवी निधीचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही दिली. त्यानंतर अकरा दिवसांनी त्यांनी निधीप्रश्नी मुंबईत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत बैठक घेतली. यात निधी देण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला. यानंतर पुन्हा मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत दि. १ जुलै २०१५ रोजी झालेल्या बैठकीत सरकारने उर्वरित ४० कोटी ३३ लाखांचा निधी टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय घेतला. यात दरवर्षी पाच ते दहा कोटी रुपये देण्याचा सरकारचा विचार होता; पण निधी देण्याबाबत काहीच झाले नाही. त्यामुळे आता तरी पालकमंत्री पाटील यांनी शासनाकडे प्रलंबित असणारा निधी मिळवून देण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा विद्यापीठाच्या विविध घटकांकडून होत आहे.