शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

करवीर तहसील रमणमळ्यात जाणार कधी ?

By admin | Updated: August 28, 2014 00:11 IST

चार कोटींचे बजेट : वर्षभरापूर्वी पाठविलेला प्रस्ताव शासनाकडे धूळखात

प्रवीण देसाई - कोल्हापूर --सतत लोकांची वर्दळ...अस्ताव्यस्त वाहने लावल्यामुळे उडालेला पार्किंगचा बोजवारा...कार्यालयात जाताना बाहेर वाहतूक पोलीस आपली गाडी केव्हा उचलतील ही धास्ती...कार्यालयातही अपुऱ्या जागेमुळे कर्मचारी व नागरिकांची होणारी अडचण...हे चित्र करवीर तहसीलदार कार्यालय येथे नित्य पाहायला मिळते. ही परिस्थिती बदलण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक वर्षभरापूर्वी हे कार्यालय रमणमळा येथे नेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे. ३ कोटी ९२ लाख रुपयांचे बजेट तयार करून पाठविलेला हा प्रस्ताव अद्याप शासनस्तरावर धूळखात पडला आहे.करवीर तहसील कार्यालयाची कार्यकक्षा लक्षात घेता सध्याच्या कार्यालयात नागरिकांची कामानिमित्त होणारी गर्दी नित्याचीच आहे. कार्यालयाच्या आवारात करवीर पोलीस ठाणे, शेजारीच असणारे न्यायालय व सीपीआर रुग्णालय यामुळे भाऊसिंगजी रोडवर नेहमीच गजबजल्याचे चित्र असते. त्यामुळे साहजिक या मार्गावर वाहतुकीचा ताण अधिक आहे. तहसील कार्यालयासह पोलीस ठाण्यामध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग हा एक मोठा यक्षप्रश्न होऊन बसला आहे. त्यामुळे वादावादीचे प्रकार सर्रास घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी एक पोलीस अधिकारी व तहसील कार्यालयातील कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. हे कार्यालय रमणमळा येथे जाण्याने रहदारीचा ताण नक्कीच कमी होणार आहे.यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रमणमळा परिसरातील शासकीय धान्य गोदामाजवळ शासनाच्या मालकीच्या दोन एकर जागेत हे कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३ कोटी ९२ लाखांच्या इमारत बांधकामाचे एस्टिमेट तयार करण्यात आले. त्यानंतर गेल्यावर्षी हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला. वर्ष होऊनही यावर शासनाकडून अद्याप काहीच उत्तर आलेले नाही. त्यामुळे करवीर तहसीलदार कार्यालय गोंगाटातून बाहेर पडून मोकळा श्वास घ्यायला रमणमळा येथे जाणार का नाही? अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.