शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

‘तुळशी’तील बाग फुलणार कधी?

By admin | Updated: January 12, 2017 22:09 IST

निसर्गरम्य परिसर बनलाय तळीरामांचा अड्डा : कारंजे, फुलझाडे, लहान मुलांच्या खेळाचे साहित्य मोडकळीस

श्रीकांत ऱ्हायकर -- धामोड  हिरव्यागार वृक्षांनी नटलेला परिसर... पाखरांच्या मधुर स्वरांची मनाला पडणारी भुरळ... सूर्यास्ताचे विहंगम दृश्य या सगळ्या निसर्गसौंदर्यांनी भरलेला तुळशी धरण परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत राहिला यात कोणतीच शंका नाही. पण, संबंधित प्रशासन व प्रभावहीन अधिकारी वर्ग यामुळे या परिसराला उतरती कळा लागली. याचा तिसरा भाग म्हणजे तुळशी तलाव बागेची दफनभूमीसारखी अवस्था झाली आहे. या बागेला गतवैभव मिळणार का? या एकाच आशेने इथला परिसर या बागेकडे पाहतो आहे.एकेकाळी धामोड येथील जलाशयाच्या सौंदर्यात भर घालून इथे येणाऱ्या पर्यटकांच्या मनाला सुखद गारवा देणारा व त्याचबरोबर लहान मुलांसह आबालवृद्धांना मनोरंजनाच्या अनेक सेवा पुरविणारा हा तुळशी बगीचा पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडायचा. मात्र, या बगीचाची अवस्था एका दफनभूमीसारखी झाली असून, बागेतील वातावरण भकास बनले आहे. या बगीचाची अवस्था अशी कोणामुळे झाली, हे सर्वांनाच ज्ञात असताना यावर कोणीच बोलत नाही.तुळशी तलावाच्या पूर्णत्वानंतर १९७४-७५च्या दरम्यान पाटबंधारे विभागाचे तत्कालीन अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांच्या संकल्पनेतून या बगीचाची निर्मिती झाली. धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना करमणुकीसह भुरळ पडली. त्यातच बागेच्या मध्यभागी असणाऱ्या हनुमान मंदिरामुळे तर देवदर्शन व विरंगुळ्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. १९९५ पर्यंत हा बगीचा सुंदरतेचे प्रतीकच ठरत होता.पण, त्यानंतर या बागेतील रंगीबेरंगी कारंजे, फुलझाडे, लहान मुलांच्या खेळाचे साहित्य, या सर्व गोष्टी हळूहळू मोडकळीस आल्या. काही अज्ञातांनी या बगीचातील बहुतांश साहित्य गायब करून ते स्क्रॅपवरती विकलेसुद्धा. मध्यंतरी तर एका अधिकाऱ्याने बगीचाच्या वैभवात भर घालणारी भोवतालची संपूर्ण झाडे तोडण्याचा हुकूमच केला अन् बगीचाला उतरती कळा लागली. गेल्या दोन-तीन वर्षांपासून काही स्थानिक लोकांनीच एकत्र येऊन बगीचातील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून देवपूजा सुरू केली. तत्पूर्वी हा परिसर म्हणजे तळीरामांचा अड्डाच बनला होता. असे असतानादेखील तुळशी धरणाच्या अधिकारी वर्गाला याकडे लक्ष द्यावे, असे का वाटत नाही? हा संशोधनाचा विषय आहे.लोकांच्या मनोरंजनाचे माध्यम असणारा हा बगीचा सध्या अनेक सुविधांअभावी धूळ खात पडला असून, याला गतवैभव कोण व केव्हा देणार, याकडे परिसरातील लोक नजर लावूनआहेत. (समाप्त)बोेटिंग सुरूकरण्याची मागणीतुळशी जलाशयात रंकाळा तलावाच्या धर्तीवर बोटिंग सुरू करण्याची मागणी होत आहे. बोटिंग सुरू केल्यास पर्यटक आकर्षित होऊन परिसरातील पर्यटनास चालना मिळणार आहे. तसेच यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराची संधीही उपलब्ध होणार आहे.विश्रामगृहाची दुरवस्थातुळशी धरण परिसरात असलेल्या विश्रामगृहाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. धरण शेजारी असूनही या विश्रामगृहात पाणी मिळत नाही. हे विश्रामगृह सुसज्ज केल्यास पर्यटकांची सोय होणार आहे.