शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पर्यटन समितीला मुहूर्त मिळणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:59 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी एकीकडे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे अथक प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अजूनही शासकीय, अशासकीय सदस्यांची कोल्हापूर जिल्हा पर्यटन समिती अस्तित्वातच आलेली नाही. शासन, प्रशासन आणि या क्षेत्रांशी संबंधितांचा एकाच दिशेने प्रवास सुरू होण्यासाठी ही समिती आवश्यक आहे.दि. ५ आॅक्टोबरपासून दि. २५ आॅक्टोबरपर्यंत ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी एकीकडे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे अथक प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अजूनही शासकीय, अशासकीय सदस्यांची कोल्हापूर जिल्हा पर्यटन समिती अस्तित्वातच आलेली नाही. शासन, प्रशासन आणि या क्षेत्रांशी संबंधितांचा एकाच दिशेने प्रवास सुरू होण्यासाठी ही समिती आवश्यक आहे.दि. ५ आॅक्टोबरपासून दि. २५ आॅक्टोबरपर्यंत देशभरात ‘पर्यटन पर्व’ राबविण्यात येत आहे. कोल्हापुरातही विविध उपक्रमांनी ‘पर्यटन पर्व’ साजरे करण्यात येणार आहे. दिवाळीपासून ते पुढील मे महिन्यापर्यंतच्या पर्यटनाला पूरक वातावरण तयार करण्यासाठी हे ‘पर्यटन पर्व’ राबविण्यात येणार असून त्यासाठी विविध उपक्रम, चर्चा, परिसंवाद यासारखे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. पालकमंत्री पाटील यांच्या पुढाकाराने वर्षापूर्वी राज्यातील सर्व टूर्स आॅपरेटर्सना तीन दिवसांसाठी कोल्हापुरात पाचारण करण्यात आले होते. कोल्हापूर हॉटेल मालक संघाने याचे नियोजन केले होते. यावेळी राज्य टूर्स आॅपरेटर्स संघाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी आपला सविस्तर अहवाल प्रशासनाला दिला होता. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक पर्यटन मंडळ स्थापन करावे, अशी त्यात महत्त्वाची सूचना होती. मात्र, वर्ष झाले तरी याची अंमलबजावणी झालेली नाही.अनेकवेळा खासदार, आमदार आणि प्रशासनातील अधिकारी यांची समिती तयार होते व त्यानुसार त्यांचा अजेंडा राबविला जातो. ‘पर्यटना’च्या नावाखाली केवळ मतदारसंघातील देवळांच्या समोर सभामंडप घालण्यासाठीही निधी वापरला जातो. मात्र, खरोखरच पर्यटनवाढीसाठी हॉटेल मालक, टूर्स आॅपरेटर्स, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, पर्यटन अभ्यासक, आदींच्या समावेशाची व्यापक समिती स्थापन करण्याची गरज आहे. प्रत्यक्ष काम करणाºया कार्यकर्त्यांनाही समितीवर घेण्याची गरज आहे. ही समिती लवकरात लवकर स्थापन करून पर्यटन विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची दिशा एकच ठेवण्यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत.ट्रान्स्पोर्ट आॅपरेटर्सना आज मार्गदर्शनकोणत्याही शहरात ट्रान्स्पोर्ट आॅपरेटर आणि टॅक्सी ड्रायव्हर यांच्याकडे पर्यटक पहिल्यांदा चौकशी करत असतात. त्याच ठिकाणी त्यांना सन्मानाची वागणूक आणि विश्वासार्हतेची खात्री झाली की मग त्या शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोनच तयार होतो. त्याचे महत्त्व जाणून आज दुपारी साडेचार ते साडेसात या वेळेत ट्रान्स्पोर्ट आॅपरेटर आणि टॅक्सी ड्रायव्हर यांच्यासाठी हॉटेल पॅव्हेलियन येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होईल. यावेळी पर्यटन महामंडळाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.