शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

नृसिंहवाडीतील मासेमारीवर कारवाईचे ‘जाळे’ कधी ?

By admin | Updated: September 8, 2015 23:31 IST

भाविकांत नाराजी : कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी

प्रशांत कोडणीकर --नृसिंहवाडी--कृष्णा-पंचगंगा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले श्री दत्त मंदिर महाराष्ट्रासह अनेक राज्यांत प्रसिद्ध आहे. असंख्य भाविक पवित्र नद्यांच्या संगमात स्नानासाठी व श्री दत्त चरणांच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. मात्र, मंदिरासमोरच मासेमारी केली जात असल्याने भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे. मासेमारी करण्यावर कारवाई कधी होणार, असा सवाल केला जात आहे. मंदिरातील दररोजचा नैवेद्य तसेच येथे होणाऱ्या धार्मिक विधीनंतर होणारे पिंडदान आदींमुळे तसेच येणारे भाविक खास माशांसाठी अन्न आणून नदीत टाकत असल्याने येथील नदीपात्रात माशांची पैदास खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे. माशांची संख्या वाढल्याने येथील नदीचे पाणी स्वच्छ राहून जलप्रदूषण कमी झाले आहे. मात्र, सध्या पावसाअभावी नदीचे पाणी कमी झाल्याने नदीतील मासे पकडण्यासाठी मच्छिमार गर्दी करत आहेत. औरवाड ते संगम मंदिरपर्यंत अनेक मासेमार सध्या मासेमारीसाठी हजेरी लावत आहेत. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असता दोन ते तीन दिवस मासेमारी बंद होते व पुन्हा यांची मासेमारी चालू होते. एकीकडे माशाला देव म्हणून दत्त मंदिरासमोर नैवेद्य अर्पण केला जातो, तर समोरच मासे नैवेद्य खाण्यासाठी वर आले असता मासेमाऱ्यांच्या गळाला लागत असल्याचे उपरोधिक चित्र समोर दिसत आहे.दत्त देव संस्थानचे विश्वस्त राहुल पुजारी, नावाडी संजय गावडे तसेच देवस्थानचे कर्मचारी सूरज जाधव, शीतल परीट, गोविंदा गावडे, सुरक्षा रक्षक रामदास लोंढे यांच्या मदतीने दत्त मंदिरासमोर नदीपात्रात लावलेले माशांचे जाळे मंगळवारी काढून टाकले.यापूर्वी अनेक वेळा कै. आमदार सा रे पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, पूर्वीच्या पोलीस निरीक्षक अश्विनी सानप यांच्या उपस्थितीत तसेच मागील वर्षी तहसीलदार सचिन गिरी, आदींच्या उपस्थितीत बैठका होऊनही मंदिर परिसर मासेमारीवर कायमचा तोडगा निघाला नाही. याबाबत प्रशासनाने लक्ष घालून औरवाड पूल ते संगम मंदिर परिसरात मासेमाऱ्यांनी मासेमारी करू नये यासाठी कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी दत्त देव संस्थान, दत्तभक्त व ग्रामस्थांकडून होत आहे.