शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

उदगावला प्राथमिक आरोग्य केंद्र कधी?

By admin | Updated: October 7, 2015 23:57 IST

लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज : जागा हस्तांतरणामुळे रुग्णालयाचा प्रश्न रेंगाळतच

संतोष बामणे --जयसिंगपूर-कवठेगुलंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीनंतर आता उदगावचा प्रश्न समोर येत आहे. जयसिंगपूर ग्रामीण रुग्णालयाच्या जागेच्या प्रश्नावरून उदगावमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. २२ हजार लोकसंख्या असलेल्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्यामुळे येथील नागरिकांना आरोग्य सेवा तत्परतेने उपलब्ध होत नसल्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.गेल्या काही वर्षांपासून जयसिंगपूरला ग्रामीण रुणालय मंजूर झालेले असून, येथे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव येथे कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गावर उदगाव येथील खोत पंपासमोर महाराष्ट्र शासनाची ३३ एकर जागा असून त्यामधील चार एकर जागा उदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आरक्षित करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा ही अगदी खेड्यापाड्यांत जाऊन पोहोचली असून, उदगावसारख्या बावीस हजार लोकसंख्या असलेल्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्यामुळे गावची आरोग्य सेवा जयसिंगपूर, सांगली व मिरजवर अवलंबून आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांसह नोकरदार, मजूर, वीटभट्टी कामगारांना आरोग्य सेवा घेण्यासाठी बाहेर गावी जावे लागत आहे. सध्या उदगावात अ व ब अशी दोन आरोग्य उपकेंद्र असून, त्यातील ब हे उपकेंद्र काळम्मावाडी येथे स्थलांतरित होणार आहे. तर दुसरे उदगाव गावठाणसाठी उपलब्ध आहे. मात्र, जयसिंगपूर ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न मिटल्याशिवाय उदगावला प्राथमिक आरोग्य केंद्र होणार नाही, अशी वस्तुस्थिती आहे.