शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाला जेव्हा जाग येते...तीन वर्षांच्या आनंदीबाई जोशी पुरस्कारांच्या वितरणासाठी तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 20:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसमीर देशपांडे/कोल्हापूर : कोणतेही पुरस्कार हे वेळच्या वेळी दिले गेले तर त्याची गोडी अधिक असते. मात्र महाराष्ट्र शासनाचे अनेक विभाग शक्यतो घाऊक पद्धतीनेच पुरस्कारांचे वितरण व्हावे या भूमिकेत असतात, हे गेली अनेक वर्षे दिसून येत आहे. आरोग्य विभागही याला अपवाद नसून, आता तीन वर्षांचे ‘डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार’ ...

ठळक मुद्देएक कोटी रुपयांची तरतूदआदिवासी विभागातील डॉक्टर यांनाही वैयक्तिक पुरस्कारांचे एकदमच वितरण करण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कसमीर देशपांडे/कोल्हापूर : कोणतेही पुरस्कार हे वेळच्या वेळी दिले गेले तर त्याची गोडी अधिक असते. मात्र महाराष्ट्र शासनाचे अनेक विभाग शक्यतो घाऊक पद्धतीनेच पुरस्कारांचे वितरण व्हावे या भूमिकेत असतात, हे गेली अनेक वर्षे दिसून येत आहे. आरोग्य विभागही याला अपवाद नसून, आता तीन वर्षांचे ‘डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार’ देण्यासाठीची तयारी या विभागाने सुरू केली आहे.

दहा वर्षांपूर्वी डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या नावे आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण अथवा उपजिल्हा रुग्णालय पुरस्कार देण्याची योजना सुरू केली. आदिवासी क्षेत्रातील आरोग्य संस्था आणि खासगी संस्थांनाही या योजनेतून पुरस्कार देण्यात येतात.तसेच खासगी स्त्री व पुरुष डॉक्टर, शासकीय स्त्री व पुरुष डॉक्टर, आदिवासी विभागातील डॉक्टर यांनाही वैयक्तिक २५ हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येतात.

महाराष्ट्राच्या अवाढव्य आरोग्य व्यवस्थेमध्ये चांगले काम करणारे डॉक्टर आणि संस्थांना यातून प्रोत्साहन मिळावे, या हेतूने या पुरस्कार योजनेची सुरुवात करण्यात आली.मात्र गेली दोन वर्षे या पुरस्कारांचे वितरणच केले गेलेले नाही. मंत्र्यांच्या तारखा मिळत नसल्यापासून ते वेगवेगळी कारणे सांगत या आरोग्य संस्थांना आणि डॉक्टरांना पुरस्कार देणेच राहून गेले आहे. आता यंदा आरोग्य विभागाला एकदम जाग आली असून २०१५-१६, २०१६-२०१७ आणि यंदाचा २०१७-२०१८ या तीन वर्षांच्या पुरस्कारांचे एकदमच वितरण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.

शासनाने २६ सप्टेंबर रोजी आदेश काढून यासाठीच्या परीक्षण समितीची व त्यातील अशासकीय सदस्यांचीही नावे निश्चित केली आहेत. त्यानुसार आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाºयांबरोबरच डॉ. ए. पी. खाडे, डॉ. मधुसूदन कर्नाटकी, डॉ. गो. सी. चिंधे आणि विलास देशपांडे यांचा या समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. 

पुरस्कार २० लाखांचे; तर ९८ लाखांचे बजेट!या तीन वर्षांचे रोख रकमेचे पुरस्कार देण्यासाठी सुमारे २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र याचा योजनेची माहिती देण्यापासून ते पुरस्कार वितरण समारंभापर्यंतचा सर्व खर्च एकत्रित करता, ते एकूण बजेट ९८ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. २० लाखांचे पुरस्कार आणि ते वितरित करण्यासाठी आणि स्पर्धा घेण्यासाठी ८० लाख रुपये खर्च असे चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे.