शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह केव्हापासून पंचांगकर्ते झाले ?, शरद पवारांचा भाजपाध्यक्षांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 21:10 IST

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2050 पर्यंत केंद्रात भाजपाची सत्ता कायम राहील, असे विधान काल केले होते. त्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला

कोल्हापूर, दि. 20 - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2050 पर्यंत केंद्रात भाजपाची सत्ता कायम राहील, असे विधान काल केले होते. त्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. अमित शाह कधीपासून पंचांगकर्ते झाले?, त्यांनी भविष्य सांगण्याचा “नवा व्यवसाय’ केव्हापासून सुरू केला? असा प्रश्न उपस्थित करत पवारांनी शाहांसह भाजपावर जोरदार टीका केली आहे. अमित शाहांचे गुजरातेतील उद्योग धंदे मला माहती आहेत, मात्र पंचांग पाहून भाकितही सांगण्याचा अमित शाहांचा नवा उद्योग मला माहीत नव्हता, अशी उपरोधिक टीका शरद पवारांनी केली आहे. कोणत्याही सरकारमध्ये मंत्रिमंडळात कोणता मंत्री असावा किंवा नसावा याचा निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. मात्र आता या घोषणा कोल्हापुरातून होत असल्याचा टोला शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना हाणला आहे. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच राणेंच्या भाजपा प्रवेशाला आपल्या शुभेच्छा असल्याचे पवारांनी सांगितले. राजू शेट्टी यांच्या सोबत मी संसदेत काम केलं आहे, पण इतर कोणी मला माहिती नसल्याचं सांगत सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांनी नामोल्लेख टाळला आहे. राजू शेट्टींचे लोकसभेतील काम दिसते. मात्र दुसरे (सदाभाऊ खोत) कोण माहीत नाहीत, त्यांचे योगदान काय? असे म्हणत पवारांनी सदाभाऊ खोत यांच्यावरही निशाणा साधला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हवामान खात्याला पुण्यात टोला हाणला होता. त्यांनी कर्जमाफीच्या धोरणावरही टीका केली होती. जागतिक मधमाशी दिन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. राज्यात पावसाने पाठ फिरवली आहे. हवामान खात्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात चार दिवसात पाऊस पडेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. हवामान खात्याचा अंदाज सातत्याने चूकत आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी खोचक टीका केली. या तज्ज्ञांचे अंदाज खरे ठरले तर ह्य त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेनह्ण असा उपरोधिक टोला मारला. तर राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर काही बोलू शकत नाही, मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी समाधानाने बँकेत गेला आहे, असे चित्र मात्र राज्यात कोठे दिसले नाही.