शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

बोरगावची लांच्छनास्पद खैरलांजी होते तेव्हा...

By admin | Updated: July 18, 2015 00:19 IST

वामन न्यायनिर्गुणे खून प्रकरण : दलित शेतकरी ठरला सामाजिक व्यवस्थेचा बळी

दत्ता पाटील-= तासगाव प्रचलित व्यवस्थेत चाली-रिती कालबाह्य होत असताना, पुरोगामी समजल्या जाणाऱ्या तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील दलित समाजातील वामन न्यायनिर्गुणे यांच्या खुनाची घटना माणुसकीला काळीमा फासणारी ठरली आहे. सर्व आयुष्य मुंबईत घालविल्यानंतर उतारवयात गावाकडे येऊन आदर्शवत शेती करणाऱ्या न्यायनिर्गुणेंना गुरुवारी केवळ तथाकथित रुढींनुसार वागत नसल्याच्या कारणावरून संपविण्यात आले. बोरगावची खैरलांजी करणाऱ्या आणि सामाजिक व्यवस्थेचा बळी ठरलेल्या घटनेचा हा ‘आॅन दि स्पॉट रिपोर्ट’...आॅन दि स्पॉट रिपोर्टवामन न्यायनिर्गुणे यांचे वडील उदरनिर्वाहासाठी मुंबईला स्थलांतरित झाले होते. त्यामुळे वामन यांचे जन्मापासूनचे सर्व आयुष्य मुंबईतच गेले. गोदीत नोकरी करून निवृत्त झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी गावाकडे वडिलोपार्जित शेती विकसित करून गावातच राहायचे, या हेतूने ते कुटुंबासह बोरगावात आले. गावात आल्यानंतर साडेपाच एकर शेती पूर्णपणे बागायती केली. नवनवीन प्रयोग राबवून आधुनिक पध्दतीने शेती करण्याचा प्रयत्न केला. तीन महिन्यांपूर्वी शेजारील शेतकऱ्याची चार एकर जमीन करारतत्त्वावर कसण्यासाठी घेतली. त्या शेतीतही उसाची लागण सुरू केली होती. शेतात त्यांनी दहा गाई, दोन म्हैशींचा मुक्त गोठ्याचा यशस्वी प्रयोगही केला आहे.न्यायनिर्गुणे यांनी सर्व आयुष्य मुंबईत घालवून गावाकडे आल्यानंतर दोनच वर्षात जिरायती शेतीचे नंदनवन केले. हे करत असताना त्यांचा गावगाड्याशी, गावातील चाली-रितीशी कधीच संबंध आला नाही. त्यांची पत्नी, एक मुलगा आणि मदतीसाठी राहिलेला मेहुणा एवढाच परिवार. हा सगळाच परिवार घर ते शेत या चाकोरीच्या बाहेर गेलेला नाही. त्यामुळे गावातील पाटील कोण आणि पुढारी कोण, याच्याशी त्यांचा कसलाच संबंध आला नाही. मुंबईसारख्या जातीव्यवस्था हद्दपार झालेल्या शहरात राहिल्यामुळे त्यांचा या व्यवस्थेशी संबंधच आला नव्हता. अनेक वर्षांपूर्वी खेड्यापाड्यात जातीव्यवस्थेचा पगडा होता. कालांतराने ही व्यवस्था मोडीत निघाली. पुरोगामी सांगली जिल्ह्याने त्याचा अंगीकारही केला. मात्र अजूनही काही गावात या अनिष्ट व्यवस्थेचा पगडा असणारे लोक आहेत, हे वास्तव वामन न्यायनिर्गुणेंच्या खुनाच्या घटनेनंतर चव्हाट्यावर आले आहे. ‘पाटलांना नमस्कार का करत नाही?’ एवढ्या कारणासाठी वामन न्यायनिर्गुणेंना जीव गमवावा लागला. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारीच आहे. सवर्णवादी पगडा गाजवणाऱ्या व्यवस्थेत अजूनही काही लोक भरडले जात आहेत, याचे प्रत्यंतर आणून देणारी आहे. या घटनेने केवळ न्यायनिर्गुणेंचाच नव्हे, तर सामाजिक व्यवस्थेचाच खून झाला असून तालुक्याच्या पुरोगामीत्वाचा बुरखाच फाडला गेला आहे. हे थांबवायचे असेल तर दोषींना कठोर शिक्षा करून अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीवर वचक निर्माण व्हायला हवा, अशी चर्चा शुक्रवारी तासगाव तालुक्यात होती.बोरगावच्या खुनाचा ‘संग्राम’कडून निषेधसांगली : बोरगाव (ता. तासगाव) येथील वामन सुबराव न्यायनिर्गुणे या वृद्ध शेतकऱ्याच्या खुनाचा संपदा ग्रामीण महिला संस्थेने (संग्राम) निषेध केला आहे. जातीयवादातून दलित समाजातील लोकांचे बळी जाण्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. याच जातीयवादी हिंसक प्रवृत्तीचे लोक सांगली जिल्ह्यापर्यंत आले असून, याला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलून कारवाई करावी, अशी मागणी संस्थेच्या कार्यवाह मीना शेषू यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, वामन न्यायनिर्गुणे यांनी शेतात केलेली प्रगती न बघविल्याने गावातील दोन तरुणांनी त्यांचा खून केला. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. समाजात अजूनही सवर्ण समाजाची दलित समाजाकडे बघण्याची मानसिकता बदलली नसल्याचे या घटनेतून दिसून येते. संशयितांनी न्यायनिर्गुणे यांना ‘तुम्ही मुंबईतून येऊन गावातील लोकांपेक्षा मोठी प्रगती केली. आमच्याकडे जरा लक्ष असू द्या, आम्ही मराठा समाजाचे आहोत’, असे टोमणे मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. न्यायनिर्गुणे यांनी संशयितांना ‘तुम्हीही कष्ट करा, मोठे व्हा’, असे समजावून सांगितले होते. तरीही वाद मिटला नाही. संशयित चंद्रकांत पाटील व सचिन पाटील यांनी घटनेदिवशी न्यायनिर्गुणे यांचे मेहुणे सुनील कांबळे यांना मारहाण केली होती. न्यायनिर्गुणे यांनी याचा जाब विचारताच त्यांनाही मारहाण केली होती. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. पण पोलिसांनी कठोर भूमिका घेतली नाही. पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना घडाव्यात ही बाब संतापजनक व खेदजनक आहे. जिल्ह्यातील एकाही पुरोगामी संघटनेने याचा निषेध केला नाही. येथून पुढे जातीपाती व धर्मा-धर्मातून कोणाचा हकनाक बळी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.किती दिवस सहन करणार?शुक्रवारी बोरगावात सन्नाटा होता. न्यायनिर्गुणेंच्या खुनाची दबक्या आवाजात चर्चा होती. मागासवर्गीय समाजावर अजूनही अत्याचार सुरू आहेत. गावात आम्हीच का कमीपणा घ्यायचा? समानतेचा बदल कधी घडणार? किती दिवस असे अत्याचार सहन करणार? या व्यवस्थेत बदल कधी घडणार? आमचा समाज गावात मूठभर आहे, म्हणून आमच्या लोकांनी हे सहन करायचे का? असा संताप न्यायनिर्गुणे यांचे मुंबईत वास्तव्य करणारे भाचे अमर कांबळे आणि सुशील कदम यांनी व्यक्त केला. आमच्या समाजातील लोक शिक्षित झाले, मात्र संघटित झाले नाहीत, त्याचाच गैरफायदा घेतला जात आहे. खेड्यात लोकांना अशा अत्याचाराचा अजूनही सामना करावा लागत आहे, असेही ते म्हणाले. या घटनेनंतर जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी भेट दिली. मात्र गावातील, तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी साधी विचारपूसदेखील केली नसल्याची खंत शंकर न्यायनिर्गुणे यांनी व्यक्त केली.खैरलांजी, नगरला जे घडले, ते तासगावसारख्या प्रगत तालुक्यात घडेल, अशी अपेक्षा नव्हती. केवळ नमस्कार करीत नसल्याच्या कारणातून मागासवर्गीय, पण कष्टाने आर्थिकदृष्ट्या सक्षम बनलेल्या कुटुंबाला मारहाण होणारी घटना चिंंताजनक असून संताप आणणारी आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी उच्चजातीतील तथाकथित नेत्यांनी गांभीर्याने घ्यायला हवे. पोलीस, न्यायव्यवस्थेकडून कठोर कारवाई होईल, याचा भरवसा वाटतो. - डॉ. बाबूराव गुरव, ज्येष्ठ पुरोगामी विचारवंतवामन न्यायनिर्गुणेंचा खून माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. दलितांवर सातत्याने अन्याय सुरू आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात दलितांना शस्त्रांचा परवाना तरी द्या, नाहीतर अत्याचार थांबवा, या मागणीसाठी आणि बोरगाव खून प्रकरणाचा निषेध करण्यासाठी २० जुलैला तासगावात निषेध मोर्चा काढणार आहोत. गावा-गावातील सामाजिक तेढ संपविण्यासाठी दलित-सवर्ण समितीची स्थापना करण्याचीही आवश्यकता आहे. - संदेश भंडारे, जिल्हाध्यक्ष, युवक आरपीआय, सांगली