शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

तर कारखान्याचं चाक बंद पडेल--सुरेश हाळवणकर : महागावात काळभैरी पॅनेलचा मेळावा

By admin | Updated: March 23, 2016 00:40 IST

हसन मुश्रीफ : गोरगरिबांचा विश्वासघात करणाऱ्यांना मते देऊ नका : शिंदे

नेसरी : मी राजकारण सोडून मदत करणारा कार्यकर्ता आहे. गडहिंग्लज कारखान्याचा हत्ती गाळात रूतत असताना बघत न बसता शेतकरी, सभासद, कामगारांचे हित लक्षात घेऊन या कारखान्यात लक्ष घातलं. ब्रीसक् कंपनीला कारखाना चालवायचा निर्णय घेतला नसता तर कदाचित कारखाना आणखीन अडचणीत आला असता. पण बेताल बोलणाऱ्या शहापूरकरांच्या बोलण्याला भुलून कदाचित सभासदांनी यावेळी वेगळा निर्णय घेतल्यास दोन वर्षांत या कारखान्याचं चाक बंद पडेल, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.बटकणंगले येथे शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी श्रीपतराव शिंदे, संग्रामसिंह नलवडे, आमदार संध्यादेवी कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.मुश्रीफ म्हणाले, कुपेकर-शिंदे ही युती चौथ्यांदा होत आहे. तेव्हा अभद्र युती म्हणणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे. कंपनीला १९ कोटींचा तोटा ३ वर्षांत झाला आहे. पण संचालक मंडळाची तयारी झाल्यास २५०० मेट्रीक टनावरून ५००० मेट्रीक टनासाठी होणारा सर्व खर्च कंपनीला देण्यास सांगतो. शिंदे म्हणाले, गोर-गरिबांच्या मुलांकडून नोकरीसाठी २/३ लाख रुपये घेतले. मशिनरी लिलावात निघाल्या तरी डेक्कनचे देणे आहे. छत्रपतींच्या नावाने सुरू केलेली बँक बंद पाडणाऱ्यांना घालवण्यासाठी व कामगारांची व सभासदांची पिळवणूक थांबविण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून, अशांना मते देऊ नका.संग्रामसिंह नलवडे म्हणाले, विरोधी पॅनेल हे अहंकाराने भरलेले पॅनेल असून, बँक बुडवणाऱ्या व तालुका संघ विकणाऱ्यांना या निवडणुकीत बाजूला करून कारखान्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी शेतकरी आघाडीला साथ द्या.आमदार संध्यादेवी कुपेकर, रामराजे कुपेकर, मुंबई बँकेचे विठ्ठलराव भोसले, दशरथ कुपेकर यांची भाषणे झाली. स्वागत दीपकराव जाधव यांनी केले. उमेदवारांची ओळख प्रकाश पाटील यांनी केली. प्रास्ताविक उमेदवार विद्याधर गुरबे यांनी केले. तर आभार विष्णू पाटील यांनी मानले.बी. एन. पाटील-मुगळीकर, उदय जोशी, आदित्य महागावकर, बाबूराव गुरबे, मुन्नासो नाईकवाडी, दयानंद नाईक, बाळ पोटे-पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)शहापूरकरच कारखाना वाचवतीलसुरेश हाळवणकर : महागावात काळभैरी पॅनेलचा मेळावागडहिंग्लज : आर्थिक अरिष्टात असणारा गडहिंग्लज कारखाना ऊर्जितावस्थेत आणून शेतकऱ्यांच्या मालकीचा होण्यासाठी कारखान्याची सूत्रे शहापूरकरांकडे देण्याची गरज आहे. किंबहुना, तेच कारखाना वाचवतील, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केले.महागावात श्री काळभैरी शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, माजी आमदार संजय घाटगे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, भाजपचे जिल्हा संघटक बाबा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी हाळवणकर म्हणाले, १५ वर्षांत गाळप का वाढले नाही, विस्तारीकरण का झाले नाही, कामगारांचे पगार का थकले? याचा विचार करा आणि कारखान्याच्या आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा शहापूरकर यांना संधी द्या.यावेळी डॉ. शहापूरकर म्हणाले, शिंदे यांनी उभ्या आयुष्यात एकही संस्था उभारली नाही. कारखान्यातही केवळ वैयक्तिक स्वार्थच पाहिला. त्यांनी एक चांगले काम दाखवावे, मी निवडणुकीतून माघार घेतो.चव्हाण म्हणाले, मुश्रीफांच्या विश्वासावरच आम्ही थांबलो होतो. त्यांनीच आमचा घात केला. विश्वासघातकी राजकारण थोपविण्यासाठी साथ द्या. यावेळी माजी आमदार घाटगे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर यांचीही भाषणे झाली. मेळाव्यास बाळासाहेब कुपेकर, कृष्णराव वार्इंगडे, संजय रेडेकर, भरमू जाधव, जयसिंग शिंदे, विजय नाईक, दिलीप माने, अनिल खोत, आदींसह उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी प्रास्ताविक केले. अर्जुन दिवटे यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब महंतशेट्टी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)