शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

माणुसकीपुढे सोने काय कामाचे !

By admin | Updated: November 8, 2014 00:24 IST

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा : ‘समीर’च्या संवेदनशील मनाला भुयेकरांची बक्षीस देऊन दाद

आदित्य वेल्हाळ - कोल्हापूर --सध्याच्या मतलबी जगात रस्त्यात सापडलेले दहा रुपयेही कुणी परत करण्याचे सौजन्य दाखवत नाही. अशावेळी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार त्यांच्या घरी जाऊन देण्याची माणुसकी केशेपाडळी (ता. कऱ्हाड) येथील समीर पालकर या रिक्षाचालकाने दाखविली. स्वार्थी जगात अजूनही माणुसकीचा ओलावा जिवंत असल्याचे समीर यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. भुये (ता. करवीर) येथील प्रदीप ऊर्फ समाधान नामदेव पाटील व उषा प्रदीप पाटील या नवदाम्पत्याच्या दुचाकीचा कराड येथील विजयनगरच्या हद्दीत भीषण अपघात झाला होता. हा अपघात समीर पालकर यांच्या समोरच घडला होता. या अपघातात प्रदीप पाटील हे जागीच ठार झाले होते, तर उषा पाटील या गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघातस्थळी अनेकांनी गर्दी केली होती, पण त्यांना तातडीने दवाखान्यात पोहोचविण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. समीरसह काही नागरिकांनी तेथून जाणाऱ्या गाड्या थांबविण्याचा प्रयत्न केला. एकानेही गाडी न थांबविल्याने अखेर समीर यांनी आपल्या घरी जाऊन रिक्षा आणून सौ. पाटील यांना तातडीने कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. समीर यांनी जखमी अवस्थेतील सौ. पाटील यांना दवाखान्यात नेल्याने त्यांच्या रिक्षात रक्त सांडले होते. दुसऱ्या दिवशी रिक्षा साफ करताना समीर यांच्या पत्नीला दीड तोळ्यांचा सोन्याचा हार रिक्षात सापडला. त्यांनी समीरना ही गोष्ट सांगितल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता पाटील कुटुंबीयांना सोन्याचा सापडलेला हार परत करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाटील यांचा पत्ता माहिती नसल्याने हार द्यायचा कुठे हा प्रश्न समीर यांना पडला. अखेर दोन दिवसांनंतर पाटील कुटुंबीयांचा पत्ता मिळाला आणि समीर आपल्या कुटुंबीयांसहीत भुये येथे आले आणि प्रदीप पाटील यांच्या आईच्या हातात त्यांनी सापडलेला सोन्याचा हार दिला. ‘माझी सूनच परत आणून दिलीस,’ असा हंबरडा प्रदीप यांच्या आईने फोडला आणि सारा गाव भावूक नजरेने समीरकडे पाहू लागला. समीरने दाखविलेल्या माणुसकीला दाद देत व त्याच्या प्रामाणिकेतला सलाम करत माजी सरपंच अभिजित पाटील व गावकऱ्यांनी त्यांचा रोख बक्षीस देऊन सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली. उषा पाटील यांना वाचविण्यासाठी दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, पण दुर्दैवाने त्यांचे प्राण वाचवू शकलो नाही. रिक्षात सापडलेला दागिना परत करून आम्ही काही मोठे काम केले नाही. माणुसकीपुढे सोने काय कामाचे ? पाटील दाम्पत्याची शेवटची आठवण त्यांच्या कुटुंबीयांना परत करणे हेच माझे कर्तव्य होते. - समीर पालकर (रिक्षाचालक)