शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जुनी पूररेषा असताना नवीन कशासाठी...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:36 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात दुसऱ्या विकास आराखड्यामध्ये (१९९९) दर्शविलेल्या पूर नियंत्रण रेषेस अनुसरून सर्व विकसन होत असताना, पुन्हा नव्याने ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात दुसऱ्या विकास आराखड्यामध्ये (१९९९) दर्शविलेल्या पूर नियंत्रण रेषेस अनुसरून सर्व विकसन होत असताना, पुन्हा नव्याने पूर नियंत्रणरेषा का आखली जात आहे? अशी विचारणा असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅन्ड इंजिनिअर्स संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. ही पूररेषा निश्चित करण्यासाठी केलेले सर्वेक्षण चुकीचे झाले असून, ते नव्याने करण्यात यावे, अन्यथा शहराची वाढ खुंटेल, अशी भीती व्यक्त केली आहे. असोसिएशनने ही लेखी तक्रार मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे केली.असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष अजय कोराणे यांनी त्या संबंधीची माहिती दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर व अमल महाडिक यांच्याही त्यांनी भेटी घेतल्या असून, या विषयांत लक्ष घालण्याची विनंती केली आहे.असोसिएशनचे म्हणणे असे : कोल्हापूर शहर व इचलकरंजी भागातून वाहणाºया पंचगंगा नदीच्या पूरनियंत्रण रेषेसंदर्भात अद्याप सर्वेक्षण नकाशे अंतिम व्हायचे आहेत. कोल्हापूर शहरास प्रामुख्याने शिवाजी पूल ते शिरोली पूल या दरम्यान पंचगंगा नदीचा स्पर्श होतो.पंचगंगा नदीकाठी वसलेले हे शहर जुने व नवे कोल्हापूर असे मर्यादित क्षेत्र कधीही हद्दवाढ न होता वसले आहे. या शहरात १९७७ व १९९९ साली पहिला व दुसरा विकास आराखडा अस्तित्वात आला व त्याप्रमाणे भागाचे विकसनही ८० टक्के पूर्ण झाले आहे.शासनाने नगरपालिकेची महापालिका झाली तरी, गेल्या४0 वर्षांत एक इंचही हद्दवाढ केलेली नाही. हद्दवाढ न करताच नव्याने प्राधिकरण केले आहे; त्यामुळे आता हद्दवाढही होणार नाही.या दोन्ही विकास आराखड्यांमध्ये पुष्कळसे विकसन यापूर्वी दिलेल्या परवानग्यांनुसार सध्याच्या दिलेल्या पूर नियंत्रण क्षेत्रामध्ये झाले आहे.या क्षेत्रामध्ये पुष्कळ प्रमाणात विकास आराखड्यातील रहिवासी, व्यापारी, सार्वजनिक, निमसार्वजनिक, आदी प्रकारचे आरक्षण असलेल्या जमिनी समाविष्ट आहेत.यामुळे संभाव्य पूरनियंत्रण रेषेचा फटका या विकसनास बसू शकतो, असे झाल्यास शासनाने या दोन्ही विकास आराखड्यांवर आधारित यापूर्वी केलेला सर्व्हे चुकीचा होता का? असा प्रश्न उपस्थित होतो.कारण या दोन्ही विकास आराखड्यातील निषिद्ध क्षेत्र व सध्याची पूर नियंत्रण रेषा यामध्ये पुष्कळ तफावत आढळत आहे. सध्याचे सर्वेक्षण शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार झाले नसल्याचे दिसून येते.सन १९८९ अन्वये जर पूररेषा निश्चित झाली असल्यास व त्याप्रमाणे दुसºया विकास आराखड्यामध्ये विकास झाला असल्यास, संभाव्य पूर नियंत्रणरेषा अचानक एवढ्या फरकानेकशी येते, याचा उलघडा होतनाही.नो डेव्हलपमेंट झोन वाढणारपंचगंगा नदीत गाळ वाढला आहे, नदीच्या दोन्ही किनाºयावर शेतीचे अतिक्रमण व नदी पात्राची रुंदी कमी झाली हे पापसुद्धा जलसंपदा विभागाचेच आहे. याकडे दुर्लक्ष झाल्याने नदीचे पाणी जयंती नाल्यामधून बॅक वॉटर स्वरूपात दसरा चौक परिसरात येते व त्याचा फटका नागरिकांना बसतो. दुसºया विकास आराखड्यात पूर नियंत्रण रेषा निश्चित करून नदी क्षेत्रावरील पुष्कळ क्षेत्रावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा फटका म्हणून नो डेव्हलपमेंट झोन मोठ्या प्रमाणावर वाढून कोल्हापूरची वाढ खुंटणार आहे, असेही असोसिएशनला वाटते.