शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
2
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
3
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
4
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
5
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
6
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
7
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
8
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
9
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
10
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
11
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
12
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
13
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
14
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
15
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
16
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
17
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
18
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
19
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
20
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
Daily Top 2Weekly Top 5

महायज्ञात संभाजीराजेंची आहुती जाते की काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:40 IST

कोल्हापूर : मराठ्यांच्या इतिहासाचा वापर करून सत्तेवर आलेले मुख्यमंत्री थापाडे आहेत. रायगडाचा चुकीचा इतिहास ते जनतेसमोर मांडत आहेत. रायगड ...

कोल्हापूर : मराठ्यांच्या इतिहासाचा वापर करून सत्तेवर आलेले मुख्यमंत्री थापाडे आहेत. रायगडाचा चुकीचा इतिहास ते जनतेसमोर मांडत आहेत. रायगड संवर्धनाच्या त्यांच्या महायज्ञात आमचे मार्गदर्शक संभाजीराजे यांचीच आहुती जाते की काय, याची आम्हाला भीती आहे, अशा शब्दांत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार संभाजीराजे यांनी रविवारी रायगड किल्ल्यास भेट देऊन पाहणी केली होती व स्वराजाच्या राजधानीचा महायज्ञ सुरु झाल्याचे जाहीर केले होते. त्यास सावंत यांनी तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले. शाहू स्मारक भवनात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेत ते बोलत होते.ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी रायगडाची पाहणी केलेल्या मुख्यमंत्र्यांनी गडावर ३०० वाडे नव्याने सापडल्याचे सांगितले आहे. हे ३०० वाडे कुठे आहेत हे त्यांनीच दाखवावे. वास्तविक तेथे शिवाजी महाराजांचा आणि अष्टप्रधान मंडळाचे वाडे असे एकूण २५ ते ३० वाडे आहेत. मुख्यमंत्र्यांनी रायगडाच्या संवर्धन व विकासासाठी ६०० कोटींच्या निधीची घोषणा केली आहे; पण आता सत्तेची पाच वर्षे संपत आली तरी सात कोटींचासुद्धा निधी मिळालेला नाही.ते म्हणाले, अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली, समुद्रात जाऊन जलपूजन करण्यात आले, पाच वर्षांत स्मारकाचे काम पूर्ण करू, असे सांगण्यात आले होते. आता पाच वर्षे संपत आली तरी पुतळा उभारण्यासाठीची मंजुरी मिळालेली नाही. रायगड संवर्धनाचा महायज्ञ सुरू केल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत; पण त्या महायज्ञात संभाजीराजेंची आहुती जाते की काय, अशी भीती आहे.