शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बहुचर्चित शिवाजी चौक सुशोभीकरण पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 10:43 IST

क्रांतिपर्वाचा साक्षीदार आणि ऐतिहासिक वारसा म्हणून नावलौकिकप्राप्त छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्याचे तसेच चौकाच्या सुशोभीकरणाचे काम आता पूर्णत्वाकडे झुकले असून, लोकार्पणाचा डामडौल टाळून साधेपणाने दि. १ सप्टेंबर रोजी त्याचे लोकार्पण होत आहे.

ठळक मुद्देबहुचर्चित शिवाजी चौक सुशोभीकरण पूर्णत्वाकडे१ सप्टेंबरला होणार लोकार्पण : ९० लाख खर्च

कोल्हापूर : क्रांतिपर्वाचा साक्षीदार आणि ऐतिहासिक वारसा म्हणून नावलौकिकप्राप्त छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्याचे तसेच चौकाच्या सुशोभीकरणाचे काम आता पूर्णत्वाकडे झुकले असून, लोकार्पणाचा डामडौल टाळून साधेपणाने दि. १ सप्टेंबर रोजी त्याचे लोकार्पण होत आहे.

सुशोभीकरणानंतर छत्रपतींचा हा पुतळा व चौक नव्या पिढीला क्रांतीची तसेच शौर्याची प्रेरणा देत राहील, इतका तो नावीन्यपूर्ण तसेच आकर्षित करण्यात आला आहे.चित्रतपस्वी कै. भालजी पेंढारकर यांनी भारतीय स्वातंत्र्याचा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा इतिहास प्रेरणादायी ठरावा म्हणून शिवाजी चौकात छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा उभा केला. परंतु गेल्या अनेक वर्षात चौकाचे सुशोभीकरण झाले नव्हते.

शहरातील एक महत्त्वाचा चौक असूनही त्याकडे फारसे कोणाचे लक्ष गेले नव्हते. या दुर्लक्षित चौकाचे महत्त्व ओळखून आमदार राजेश क्षीरसागर यांनी सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.आमदार क्षीरसागर यांनी शहरवासीयांना तसेच इतिहासप्रेमींना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून आर्कि टेक्ट सूरज जाधव, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडून संकल्पचित्र तयार करून घेतले.

अनेकांच्या सूचनेतून तयार करण्यात आलेल्या संकल्पचित्राच्या आधारे पुतळ्याचे तसेच चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले. शिवसेना नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, तसेच आमदार क्षीरसागर यांनी या कामासाठी ९० लाख रुपये उपलब्ध करून दिले.पूर्वीच्या चबुतऱ्यात कोणताही बदल केला नसला तरी फौंडेशन, परिसर विकास, ब्रॉँझमध्ये तयार केलेले म्युरल्स अशी त्याची संकल्पना आहे. ५० फूट लांबीची भिंत आणि त्यावर शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित चित्रे कोरण्यात आली आहेत. राजमुद्रा व आकर्षक विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे.प्रत्येक विषयात जसे वाद निर्माण होतात; तसा वाद सुशोभीकरणाच्या कामातही निर्माण झाले. पुतळ्याच्या ठिकाणी मावळा व कुत्र्याचे शिल्प नको म्हणून मागणी झाली. मूळ चबुतरा बदलला जाऊ नये म्हणूनही वाद घातला गेला. त्यामुळे त्यात काही बदल करण्यात आले. सर्वांच्या सूचना व अपेक्षांना वाव देत हे सुशोभीकरण एकदाचे पूर्ण झाले.

साधेपणाने होणार लोकार्पणया कामाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र, महापुराच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची भव्यता टाळून साधेपणाने लोकार्पण होणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत दि. १ सप्टेंबर रोजी कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात आमदार क्षीरसागर त्यांच्या मतदारसंघातील महापुरात अंशत: पडझड झालेल्या कुटुंबीयांना पाच हजार, तर पूर्णत: घर पडलेल्यांना दहा हजार रुपयांची वैयक्तिक मदत करणार आहेत. 

 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkolhapurकोल्हापूर