शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पोलंडच्या राजदूत, उच्चायुक्तांचे कोल्हापुरी पद्धतीने स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:23 IST

पोलंड देशाचे भारतातील राजदूत अ‍ॅडम बुरक्वोस्की आणि उच्चायुक्तडेमियन आयरझिक, इवा स्टॅनक्यू, रॉबर्ड डेझिडिस्क यांचे सोमवारी कोल्हापुरी पद्धतीने स्वागत करण्यात आले

ठळक मुद्देआज वळीवडे कॅम्प, विद्यापीठास भेट - रंगपंचमीचा लुटला आनंद : तुतारीचा निनाद, औक्षणाने पाहुणे भारावले

कोल्हापूर : पोलंड देशाचे भारतातील राजदूत अ‍ॅडम बुरक्वोस्की आणि उच्चायुक्तडेमियन आयरझिक, इवा स्टॅनक्यू, रॉबर्ड डेझिडिस्क यांचे सोमवारी कोल्हापुरी पद्धतीने स्वागत करण्यात आले. तुतारीचा निनाद, कोल्हापुरी फेटा, औक्षण, अशा जंगी स्वागताने पाहुणे भारावलेच; पण देश, सीमा, भाषा आणि सांस्कृतिक भेदाभेदांच्या भिंती दूर करणाऱ्या रंगपंचमीच्या रंगातही रंगून गेले.दुसऱ्या महायुद्धावेळी पोलंडच्या निर्वासितांना कोल्हापूरच्या छत्रपतींनी आश्रय दिला होता. सप्टेंबर महिन्यात त्या घटनेला ८० वर्षे पूर्ण होत आहेत. कोल्हापूर आणि पोलंडवासीयांचे ऋणानुबंध, या घटनेच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी पोलंडच्या राष्ट्रपतींना सप्टेंबर महिन्यात येण्याचे निमंत्रण दिले होते. त्याच्या पूर्वतयारीसाठी पोलंडचे राजदूत सोमवारी व मंगळवारी कोल्हापूर दौºयावर आहेत.सोमवारी सायंकाळी हॉटेल सयाजी येथे खासदार संभाजीराजे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांना रंगपंचमीची माहिती दिली. इतकेच नव्हे, तर त्यांनी रंगही खेळले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, रविराज निंबाळकर, कॅप्टन शिवाजीराव महाडकर, रवी पाटील, प्रवीण पोवार, अनुप महाजन, हेमंत साळोखे, आशुतोष बेडेकर उपस्थित होते. आज, मंगळवारी ते वळीवडे कॅम्प, शिवाजी विद्यापीठ, सेंट झेविअर्स, ताराराणी चौकाजवळील पोलिश स्मशानभूमी, महावीर उद्यानास भेट देणार आहेत. महावीर उद्यान येथे कोल्हापुरातील नागरिक व मान्यवरांच्या भेटी घेऊन शेवटी नवीन राजवाडा, कोल्हापूर येथे छत्रपतींच्या निवासस्थानी भेट देऊन कृतज्ञता व्यक्तकरणार आहेत.दुसºया महायुद्धात हिटलरकडून पोलंडवासीय नागरिकांचा मोठा संहार सुरू होता. या निर्वासितांना १९४३ ते ४८ या काळात भारतातील ‘कोल्हापूर’ आणि ‘जामनगर’ या दोन संस्थांनांनी आश्रय दिला. कोल्हापूरचे शहाजी छत्रपती यांनी त्यांना सर्व सोईसुविधा पुरविल्या. त्यांच्यासाठी वळीवडे कॅम्प म्हणजे आताचे गांधीनगर येथे कुटुंब छावण्या तयार केल्या. येथे १० हजार पोलंडवासीय होते. येथे बागा, शाळा, दवाखाना, एक चर्चही उभे राहिले. रस्त्यांना पोलिश नावे दिली; त्यामुळे वळीवडे छावणीबरोबर या पोलिश नागरिकांचे भावनिक नाते जडले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती