शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine : लसीचे रोज ५० हजार डोस मिळण्यासाठी प्रयत्न करणार : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 18:58 IST

Corona vaccine Kolhapur : मागील काही दिवसांपासून जिल्ह्याला कोरोना प्रतिबंध लसीचे डोस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे पुरेशा प्रमाणात लसीकरण होत नाही. त्यामुळे रोज ५० हजारांपर्यंत लस राज्य शासनाने जिल्ह्याला पुरवावी, याबाबत आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्देलसीचे रोज ५० हजार डोस मिळण्यासाठी प्रयत्न करणारराज्य शासनाकडे पाठपुरावा करणार : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्याला कोरोना प्रतिबंध लसीचे डोस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे पुरेशा प्रमाणात लसीकरण होत नाही. त्यामुळे रोज ५० हजारांपर्यंत लस राज्य शासनाने जिल्ह्याला पुरवावी, याबाबत आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिली.कोरोना लसीकरणाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारुख देसाई, वैद्यकीय अधिकारी हर्षला वेदक, महानगरपालिकेचे माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अमोल माने उपस्थित होते. यावेळी त्यांनी सध्या उपलब्ध असणारी लस दिव्यांग, परदेशी जाणारे विद्यार्थी, नोकरदार व तृतीयपंथीय यांना निश्चित दिवशी प्राधान्याने देण्यात यावी. तसेच आरोग्य सेवकांना दुसरा डोस देण्यासाठीही पाठपुरावा करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हाधिकारी म्हणाले, मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूर भेटीदरम्यान कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात तपासण्यांची संख्या २० हजारांपर्यंत वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या, त्यानुसार तालुकानिहाय प्रयत्न सुरू असून रोज २८ ते ३० हजार तपासण्या होत आहेत ही समाधानाची बाब आहे. ज्या तालुक्यामध्ये ग्रामीण व नागरी भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, त्यांना लसीचा जास्त पुरवठा करून प्रथम ६० वर्षांवरील व त्यानंतर ४५ ते ६० वर्षे वयाच्या नागरीकांचे प्राधान्याने लसीकरण पूर्ण करा असेही ते म्हणाले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर