शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

जिल्ह्याचे राजकारण आम्हीच ठरवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 1:01 AM

कळंबा : राजकारणास विधायक समाजकारणाची जोड दिल्यानेच महाडिक कुटुंबात सर्व मानाची पदे जनतेने दिली आहेत. शब्दास जागणारा, सर्वसामान्यांचा नेता अशी आपली प्रतिमा झाल्याने जिल्ह्याचे राजकारण महाडिकच ठरवणार, असे मत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केले. प्रभाग ७३ फुलेवाडी रिंगरोड येथील महेश्वर मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित महाप्रसाद वाटप कार्यक्रमात ते बोलत ...

कळंबा : राजकारणास विधायक समाजकारणाची जोड दिल्यानेच महाडिक कुटुंबात सर्व मानाची पदे जनतेने दिली आहेत. शब्दास जागणारा, सर्वसामान्यांचा नेता अशी आपली प्रतिमा झाल्याने जिल्ह्याचे राजकारण महाडिकच ठरवणार, असे मत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केले. प्रभाग ७३ फुलेवाडी रिंगरोड येथील महेश्वर मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित महाप्रसाद वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मेजर वसंतराव देसाई होते.कुरघोडीचे व सुडाचे राजकारण न करता विधायक काम करणे ही आपली वृत्ती आहे. जनतेच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य आहे. भविष्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान करू, असेही महादेवराव महाडिक म्हणाले. वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त आयोजित महिलांच्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ व गुणवंतांचा सत्कार भगिरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष अरुंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. रविवारी महाप्रसादाचे वाटप खासदार धनंजय महाडिक व आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रविवारी सायंकाळी कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर महाराजांच्या सत्संगाने कार्यक्रमाची सांगता झाली. वर्धापन सोहळ्याचे आयोजन विजयसिंह देसाई यांनी केले होते. कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अशिष ढवळे, शिवसेना शहरप्रमुख सुजित चव्हाण, पृथ्वीराज सूर्यवंशी, मानसिंग पाटील, नगरसेविका रिया कांबळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रोहन कापसे यांनी केले. नीलेश देसाई यांनी आभार मानले.