शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

‘हम भी, कुछ कम नहीं’--असा खेळ अशी रणनीती

By admin | Updated: November 18, 2014 01:08 IST

फुलेवाडीचा इशारा : अनुभवी रौफखानच्या उपस्थितीमुळे संघात नवचैतन्य

सचिन भोसले - कोल्हापूर -यंदाचा हंगामात आपल्या संघाचा ठसा उमटविण्यासाठी फुलेवाडी क्रीडा मंडळ फुटबॉल संघाने कोलकात्याच्या मोहामेडन, गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स, साळगांवकर स्पोर्टस्, महिंद्रा अँॅड महिंद्रा या संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या रौफखान या आंतरराष्ट्रीय खेळाडूस करारबद्ध केले आहे. त्यामुळे या संघात नवचैतन्य आले आहे. लीग मध्ये अव्वल स्थान मिळविण्याबरोबच नॉक आऊट स्पर्धा जिंकण्यावर भर दिला आहे. त्यामुळे फुलेवाडी क्रीडा मंडळाचा यंदा सर्व संघांना ‘हम भी, कुछ कम नहीं’ असा इशाराच दिला आहे. त्यामुळे फुलेवाडी विरुद्धचे सर्व सामने अधिक रंगतदार होणार आहेत. नव्वदीच्या काळात आपल्याही भागाचा संघ कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात असावा म्हणून महादेव शेळके (बापू) यांनी युरोप दौरा केला. या दौऱ्यानंतर फुलेवाडी क्रीडा मंडळाचा फुटबॉल संघाची स्थापना करण्यात आली. सध्या या संघाची ओळख ‘व्यावसायिक संघ’ म्हणून कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वात झाली आहे. या संघासाठी अमोल माने, राहुल माने यांनी अनेक वर्षे पाठबळ दिले आहे तर संघाची तयारी युवराज पाटील, अजित वाडेकर, अमर पाटील हे करून घेत आहेत. प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच खेळण्याचा निर्धार या संघाने केला आहे. त्यादृष्टीने सर्व नवोदितांना सामन्यांमध्ये अधिकाधिक संधी दिली जाणार आहे. तंदुरूस्ती राखण्यासाठी जास्तीत जास्त सरावावर भर दिला आहे. सकाळी साडेसहा ते दहा वाजेपर्यंत सराव घेतला जात आहे. क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या या संघाने लीग स्पर्धेचे दोनवेळा उपविजेतेपद मिळविले आहे. यंदा लीगमध्येही अव्वल येण्याबरोबरच नॉक आऊट स्पर्धाही जिंकण्यावर भर दिली जाणार आहे. त्यासाठी कोलकाता येथील रौफखान यांच्याबरोबरच अरुण शु गुप्ता, राजा दास हे राष्ट्रीय खेळाडूही करारबद्ध केले आहेत. स्टार खेळाडूरोहित मंडलिक, मोहित मंडलिक, अजित पोवार, रोहित जाधव, तेजस जाधव, रोहित साठे, सुशांत अतिग्रे, सूरज शिगटे, अनिकेत जाधव, अनिकेत तेवरे, मंगेश दिवसे, निखील खाडेनवोदित खेळाडू हेच आमचे पुढचे स्टार असल्याने त्यांच्या कामगिरीवर अधिक लक्ष दिले जाणार आहे. यासाठी आयलीग, ड्युरंड कप खेळलेले खेळाडू संघात करारबद्ध केले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या संघासह कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वालाही होणार आहे. २२ खेळाडूंपैकी १९ खेळाडू हे व्यावसायिक खेळाडू म्हणून आपल्या संघातून खेळत आहेत. - युवराज पाटील, संघव्यवस्थापक, फुलेवाडी आमचा संघ प्रत्येक स्पर्धा आणि सामना जिंकण्यासाठीच खेळणार आहे. त्यादृष्टीने प्रत्येक खेळाडूच्या वैयक्तिक कामगिरीवर लक्ष दिले जात आहे. यासाठी विशेष व्यायाम आणि अडीच तासांचा सराव घेतला जात आहे. व्यावसायिक संघ म्हणून देशातील दर्जेदार खेळाडूंना करारबद्ध केले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा आमच्या नवोदितांना अधिक होणार आहे. - अजय वाडेकर, प्रशिक्षक, फुलेवाडी क्रीडा मंडळसंघातील  जुने खेळाडू असेअमर पाटील, युवराज पाटील, अभिजित जाधव, अतुल राबाडे, सरदार पाटील, अजित तांबेकर, विलास पोवार, राजू चौगुले, शेळके बंधू, अबिद पेंढारी, अजित वाडेकर, सुनील घाटगे, इंद्रजित सूर्यवंशी, राजू सुळेकर, उदय आतकिरे, उदय सुळेकर, नंदू टिपुगडे, नंदू यादव, भरत माने, दीपक खोत, अमर अपराध, अनिल साळोखे, अनिल भालेकर, शिवाजी संकपाळ, संदीप घाटगे, प्रताप भट आदी