शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘आमचंही ठरलंय’ यंदा गणेशोत्सव दणक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 12:07 IST

आॅक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील तालीम, तरुण मंडळांनी गणेशोत्सव दणक्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. यात इच्छुक उमेदवारांसह नेतेमंडळी या मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याने यंदाचा गणेशोत्सव झोकात होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मंडळांची तयारी सुरू नेते मंडळींच्या अंगावर आतापासून शहारे

कोल्हापूर : आॅक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील तालीम, तरुण मंडळांनी गणेशोत्सव दणक्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. यात इच्छुक उमेदवारांसह नेतेमंडळी या मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याने यंदाचा गणेशोत्सव झोकात होण्याची शक्यता आहे.प्रतिवर्षाप्रमाणे तालीम मंडळांना गणेशोत्सव दिमाखदार स्वरूपात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नेते मंडळी, उद्योजक, व्यापारी वर्गणी देतात. त्यातून मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. गेल्यावर्षी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे मोठ्या आवाजाचे साऊंड सिस्टिम कमी प्रमाणात वाजल्या; त्यामुळे २०१८ चा गणेशोत्सव ध्वनी प्रदूषणापासून काही प्रमाणात वाचला, तर यंदा विधानसभेची निवडणूक महिना, दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे; त्यामुळे मंडळांचे आश्रयदाते असलेली नेतेमंडळी या मंडळांना अर्थसहाय्य पुरविण्यास उत्सुक आहेत. त्याचाच फायदा घेत अनेक मंडळांनी आतापासूनच गणेशोत्सवाच्या नियोजनास सुरुवात केली आहे.

यात एकवीस, चौदा फुटी गणेशमूर्ती बसविण्याचे नियोजन केले आहे. याच्या जोडीला लेझर लाईट, साऊंड सिस्टिम, विविध प्रकारची वाद्यवृंदे, नृत्य प्रकार सादर करणाऱ्या मुंबई, चेन्नई, हैदराबाद येथील संस्थांशी संपर्क साधला आहे. त्यांच्या बजेटचा अंदाज घेण्याचे कामही मंडळाचे कार्यकर्ते करीत आहेत. मंडळाचे कार्यकर्ते बोलताना ‘भावा घाबरायचं नाय, यंदा दणक्यात गणपती करायचा’ असे एकमेकांना सांगत आहेत; त्यामुळे यंदा आगमन व विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टिमसह मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती मंडळांकडे पाहण्यास मिळणार आहेत.

पावसातही अनेक मंडळांच्या कार्यालयात मोजक्याच कार्यकर्त्यांच्या बैठकाही झडू लागल्या आहेत. यात मागील वर्षीचे हिशेब पूर्ण करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याच सोबतीला यंदा नावीन्यपूर्ण काय करायचे, याचाही विचार सुरू झाला आहे. विशेषत: काही नेतेमंडळींनी पेठापेठांतील मंडळांशी आतापासूनच संपर्क साधला आहे. तुम्ही आकडा सांगायचा आणि आम्ही तो पूर्ण करायचा, असेही वायदे केल्याची चर्चा आहे; त्यामुळे विधानसभा येत्या दोन महिन्यांत होवो अथवा पुढे कधीपण होवोत, गणेशोत्सव मात्र दणक्यात होणार हे कार्यकर्त्यांनी निश्चित केले आहे.

काही इच्छुकांची गणेशोत्सवाच्या तोंडावर उमेदवारी जाहीर केली, तर गणेशोत्सवाची देणगी आणि दोन महिन्यांनी होवू घातलेल्या निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांवर करायचा खर्च असे दोन्ही वेळेला खर्चाचा भार पडला आहे; त्यामुळे अशा छुप्या इच्छुकांच्या अंगावर आतापासूनच शहारे आले आहेत, अशा इच्छुकांनी सावध पवित्रा घेतला आहे.इथेही ‘आमचंही ठरलंय’शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा या पक्षांच्या नेहमीच्या नेतेमंडळींबरोबर नवोदितांनाही तिकीट आपल्यालाच मिळेल, अशी आशा आहे; त्यामुळे प्रत्येकजण आपल्याकडे इतकी मंडळे, कार्यकर्ते आहेत, हे दाखविण्यासाठी या मंडळांच्या कार्यकर्त्यांना आतापासूनच बरोबरीला घेत आहेत. यात पक्षाच्या हाय कमांडकडे इच्छुक आहे, असे दाखविण्यासाठी या कार्यकर्त्यांना सोबत घेत आहेत. त्याचाच अंदाज घेत या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाचा ‘आमचंही ठरलंय’ असे सांगण्यास सुरुवात केली आहे. 

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर