शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही सगळे दहावी पास, कोल्हापूर विभागाचा ९९.९२ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 19:12 IST

Ssc Result Kolhapur : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द झाल्याने यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे शुक्रवारी ऑनलाइन निकाल जाहीर झाला. त्यात अर्ज भरून मूल्यांकन प्राप्त कोल्हापूर विभागातील १,३४,८३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे ह्यआम्ही सगळे दहावी पासह्ण असे आनंदाचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये होते. कोल्हापूर विभाग ९९.९२ टक्क्यांसह राज्यात आठव्या क्रमांकावर राहिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत २.२८ टक्क्यांनी निकाल वाढला.

ठळक मुद्देविभागात सांगली जिल्हा प्रथम : मुलींची आघाडी कायमकोल्हापूर जिल्ह्याचा ९९.९० टक्के निकाल

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द झाल्याने यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे शुक्रवारी ऑनलाइन निकाल जाहीर झाला. त्यात अर्ज भरून मूल्यांकन प्राप्त कोल्हापूर विभागातील १,३४,८३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे ह्यआम्ही सगळे दहावी पासह्ण असे आनंदाचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये होते. कोल्हापूर विभाग ९९.९२ टक्क्यांसह राज्यात आठव्या क्रमांकावर राहिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत २.२८ टक्क्यांनी निकाल वाढला.या विभागातील लेखी आणि अंतर्गत परीक्षा दिली नसलेले अवघे १०६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. कोल्हापूर विभागात ९९.९४ टक्क्यांसह सांगली जिल्हा अव्वल ठरला. सातारा जिल्हा ९९.९२ टक्क्यांसह द्वितीय, तर कोल्हापूर जिल्हा ९९.९२ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर राहिला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव देविदास कुलाळ यांनी निकालाची माहिती दिली.

यंदा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील १,३४,९४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील १,३४,९३९ जणांचे मूल्यांकन प्राप्त होऊन त्यापैकी १,३४,८३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ७३,४०३ मुले उत्तीर्ण झाली असून, त्यांचे प्रमाण ९९.९० टक्के, तर ६१४३० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे प्रमाण ९९.९३ टक्के आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ०.०३ टक्के जादा आहे.जिल्हानिहाय निकाल

  • सांगली : ९९.९४ टक्के
  • सातारा : ९९.९२ टक्के
  • कोल्हापूर : ९९.९० टक्के

विभागाचा निकाल एका नजरेत

  • एकूण माध्यमिक शाळा : २,२९९
  • विशेष प्रावीण्य श्रेणीतील उत्तीर्ण विद्यार्थी : ५७,३१०
  • प्रथम श्रेणी व ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी : ५३,७४१
  • पुनर्प्रविष्ट विद्यार्थी उत्तीर्ण : ४,१३१

यावर्षी कोल्हापूर विभागाच्या दहावीच्या निकालात २.२८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विभाग राज्यात आठव्या क्रमांकावर असला, तरी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत टक्केवारीत फार मोठा फरक नाही. विभागात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. सातारा जिल्ह्यात शंभर टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. शाळांकडून मूल्यांकन प्राप्त झाले नसलेल्या २७८ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. त्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विभागाच्या टक्केवारीत आणखी वाढ होईल.-देविदास कुलाळ,विभागीय सचिव

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालkolhapurकोल्हापूर