शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीच्या कामात ‘ढपला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:45 IST

कोल्हापूर : शहराचा पाणीपुरवठा कधी सुरळीत व्हायचा तो होऊ दे, नवीन जलवाहिनी कधी टाकायच्या ते टाकू देत पण आमचं ...

कोल्हापूर : शहराचा पाणीपुरवठा कधी सुरळीत व्हायचा तो होऊ दे, नवीन जलवाहिनी कधी टाकायच्या ते टाकू देत पण आमचं काय? असा सवाल विचारणाऱ्या नगरीच्या सेवकांना जेमतेम बोनस देऊन ‘कारभाºयां’नी मोठा ढपला पाडल्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात सुरू आहे. १०८ कोटींच्या जलवाहिनी टाकण्याच्या कामात समान व समाधानकारक वाटपाचे सूत्र बदलल्याने ही चर्चा नाराज झालेल्यांकडून पुढे आली आहे.‘कारभाºयां’नी नेहमीच्या पद्धतीने याही प्रकरणात ‘हात’ मारल्यामुळे कोणाला ५५ हजारांचा तर कोणाला पावणेदोन लाखांचा बोनस मिळाला आहे. बाकीचा सर्व बोनस ठराविक ‘कारभाºयांनी’च लाटल्याचे समजते. त्यामुळे पालिका वर्तुळात नव्यानेच चर्चेला सुरुवात झाली आहे.शहरात १०८ कोटी रुपये खर्च करून नवीन जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. आपल्याच कारकिर्दीत हे काम मंजूर व्हावे म्हणून तत्कालिन बावडेकर सभापतींनी फारच आग्रह धरला होता. परिपूर्ण प्रस्ताव स्थायी समितीसमोर येईपर्यंत या सभापतींची कारक ीर्द संपली तरीही या सभापतींनी आग्रह सोडला नाही.‘कारभाºयां’चे त्यांना पाठबळ असल्याने नवीन सभापतींची निवड काही दिवस पुढे ढकलली. दरम्यानच्या काळात ‘चेअरमन फॉर द मिटिंग’चा आधार घेत त्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. इतका सगळा प्रताप केल्यानंतर या सभापतींनी गेल्या नऊ महिने सातत्याने इमानेइतबारे संबंधित ठेकेदाराबरोबर पाठपुरावा केला.या प्रकरणात तत्कालिन सभापती आणि कारभाºयांनी अडीच खोक्यांचा ढपला पाडल्याची चर्चा असली तर प्रत्यक्षात ८० पेट्यांचाच हा व्यवहार झाल्याचे सांगत सामान्य नगरीच्या सेवकांची फसगत केल्याचा आक्षेप घेतला जात आहे. पाण्यात ‘घाण’ केल्यावर कधी ना कधी वर येते, या निसर्गनियमाप्रमाणे या व्यवहारातील सत्य दोन दिवसांपासून बाहेर आले आहे.त्यामुळे कारभाºयांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. नेहमीप्रमाणे याही वेळी कारभाºयांनी आपली फसवणूक केल्याची भावना नगरीच्या सेवकांची झाली आहे.सोमवारी रात्री ट्रान्सफॉर्मर जळाल्याने शहरातील पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. त्याकडे दुर्लक्ष करत कधी पाणी मिळायचे ते मिळू दे, जलवाहिनी कधी टाकायच्या त्या टाकू देत आमचं आणि त्याच काही देणं-घेणं नाही, आमचा संबंध फक्त घेण्याशी आहे, बाकीचे अधिकारी बघून घेतील, अशा विचारांचे नगरीचे सेवक मंगळवारी महापालिकेकडे फिरकलेही नाहीत. विशेष म्हणजे या प्रकरणात पक्ष आघाडी यांचे राजकारण बाजूला ठेऊन सर्वजण एकत्र आल्याचेही चित्र पाहायला मिळाले.धुसफूस नगरसेवकांत : ‘कारभारी’ मोकळेचमहापालिकेत एखादा फायद्याचा विषय असला की सर्व गट-तट, पक्ष विसरून सगळे एकत्र येतात. त्यावेळी आघाडीतील राजकारण विसरून जातात. काही ठरावीक ‘कारभारी’च त्यात लक्ष घालतात, तेच तडजोडी करतात. नगरीच्या सर्वसामान्य सेवकांना त्यातील काहीच कल्पना नसते. शेवटपर्यंत त्यांना काही कळू दिले जात नाही. ठरावीक आकड्यांची पाकिटे त्यांना दिली जातात. पुढे काही दिवसांनी त्या व्यवहारातील सत्य बाहेर पडते आणि आघाडीत धुसफूस सुरू होते. त्याचा राग सर्वसाधारण सभेत व्यक्त होतो. एकाच पक्षाचे दोन सेवक वेगवेगळी भूमिका घेतात आणि समोरच्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो; पण ‘कारभारी’ मात्र नामानिराळेच राहतात.