शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

कोल्हापुरात पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 01:07 IST

कोल्हापूर : वारंवार गळतीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवून शहरवासीयांच्या घशाला कोरड पाडणाऱ्या महापालिका पाणीपुरवठा विभागाचा पुरवठ्याचा खेळखंडोबा थांबणार कधी? ...

कोल्हापूर : वारंवार गळतीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवून शहरवासीयांच्या घशाला कोरड पाडणाऱ्या महापालिका पाणीपुरवठा विभागाचा पुरवठ्याचा खेळखंडोबा थांबणार कधी? असा संतप्त सवाल शहरवासीयांतून विचारला जात आहे. चार दिवसांपूर्वी कळंबा टाकी व बुद्धीहाळकरनगर येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले नाही, तोवरच आता शुक्रवारी (दि. २९) चंबुखडीजवळील व्हॉल्व्ह बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने या दिवशी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.शिंगणापूर आणि बालिंगा योजनेवरील दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचे सांगून प्रत्येक आठवड्याला सतत पाणीपुरवठा खंडित ठेवला जात आहे. पूर्वी कधी तरी सहा महिन्यांतून एकदा दुरुस्तीचे काम हाती घेतले जात होते, परंतु अलीकडे प्रत्येक आठवड्यात दुरुस्ती काढली जात आहे. दोन्ही पैकी एका योजनेचा पाणीपुरवठा बंद ठेवला तर त्याचा परिणाम निम्म्या शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत असून, अशा वारंवार खंडित होणाºया पाणीपुरवठ्याला शहरवासीय वैतागले आहेत.महापुराच्या काळात संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा सलग पंधरा दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी परिस्थिती गंभीर असूनही शहरवासीयांनी वास्तव लक्षात घेऊन प्रशासनास सहकार्य केले; पण आता सगळी यंत्रणा चांगली असताना, नदीत पाणी मुबलक असताना पुन्हा पुन्हा पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ लागला आहे. त्यामुळे संतप्त भावना आहेत.बालिंगा पंपिंग ते चंबुखडी संतुलन टाकीकडे जाणाºया मुख्य उपसा जलवाहिनीस वॉशआऊट व्हॉल्व्ह बसविण्याचे काम शुक्रवारी सकाळी हाती घेतले जाणार आहे. या दिवशी पाणी उपसा पूर्णपणे बंद ठेवावा लागणार आहे. परिणामी ए, बी, सी, डी वॉर्डांतील पाणीपुरवठा होणार नाही.शहरातील : पाणी न येणाºया भागांची नावेए, बी वॉर्ड, त्यास सलग्नित उपनगरे, ग्रामीण भाग व शहरांतर्गत येणाºया लक्षतीर्थ वसाहत परिसर, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, शिवाजी पेठ, मंगळवार पेठेचा काही भाग.सी, डी वॉर्ड व त्यास संलग्नित दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ तालीम, लक्ष्मीपुरी, सोमवार पेठ, बिंदू चौक, महालक्ष्मी मंदिर, मिरजकर तिकटी.ई वॉर्ड व त्यास संलग्नित शाहूपुरी ५वी, ६वी गल्ली, कुंभार गल्ली, पार्वती टॉकीज, खानविलकर पेट्रोल पंप, उद्यमनगर परिसर.