शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

बस्तवाडला दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: November 6, 2014 00:38 IST

पन्नासजणांंना साथीचे आजार : टँकरने पाणीपुरवठा सुरू; आरोग्य यंत्रणा खडबडून जागी

कुरुंदवाड : कृष्णा नदीत मळीयुक्त दूषित पाणी आल्यामुळे बस्तवाड (ता. शिरोळ) येथील नागरिकांना उलट्या व जुलाब होत असून, पन्नासहून अधिक लोकांना या साथीच्या आजारांची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, नदी दूषित करणाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे. दूषित पाण्यामुळे नदी उशाला असूनही ग्रामस्थांना टॅँकरच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या साथीच्या आजारांमुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, तालुका वैद्यकीय अधिकारी पी. एस. दातार यांच्या नेतृत्वाखाली आठ डॉक्टरांचे पथक कार्यरत झाले आहे. दरम्यान, दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याने आमदार उल्हास पाटील, जि. प. आरोग्य सभापती सीमा पाटील यांनी गावाला भेट देऊन रुग्णांची चौकशी केली.कृष्णा नदीकाठावर असलेल्या बस्तवाड गावाला या नदीतून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. गावाला फिल्टर योजना नसल्याने टीसीएल (पाणी शुद्धिकरण पावडर) वापरून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या दोन दिवसांपासून नदीला काळेकुट्ट व दुर्गंधी सुटणारे मळीयुक्त पाणी आल्याने व ते पाणी गावात पुरवठा केल्याने नागरिकांना उलट्यांचा त्रास जाणवू लागला. सरपंच शमाबानू जमादार, उपसरपंच जे. डी. चव्हाण यांनी आरोग्य विभागाला कळविल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. आज, बुधवारी सकाळी पंचायत समिती तालुका वैद्यकीय अधिकारी पी. एस. दातार यांच्या नेतृत्वाखाली व टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एम. ए. ऐनापुरे यांच्यासह आठ डॉक्टरांच्या पथकाने तपासणी व उपचार मोहीम सुरू केली. अचानक उद्भवलेल्या साथीच्या आजारांमुळे नागरिकांतून भीती व्यक्त होत असून, ग्रामस्थांना पिण्यासाठी दत्त साखर कारखान्याच्या अग्निशमन विभागाकडून टॅँकरने पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ग्रामस्थांची झुंबड उडाली असून, नदी उशाला व तुडुंब भरलेली असतानाही पाण्याच्या टॅँकरची वाट पाहावी लागत आहे, हे दुर्दैव आहे.गावामध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे समजताच आ. उल्हास पाटील यांनी गावाला भेट देऊन नदीतील पाण्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. तसेच जि. प. आरोग्य सभापती सीमा पाटील, स्वाभिमानी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील, विजय पाटील यांनी नदीतील प्रदूषित पाणी घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गावाला टँकरने शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी इरफान जमादार, जे. डी. चव्हाण, जाफर पटेल, महावीर मगदूम, आसिफ पटेल, दिलावर पटेल, आदी प्रयत्न करीत आहेत, तर गावातील तरुण कार्यकर्त्यांनी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीची श्रमदानातून स्वच्छता केली. (प्रतिनिधी)कृष्णा नदीत अचानक आलेल्या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे उपसरपंच जे. डी. चव्हाण म्हणाले. ते म्हणाले, त्यामुळे गावाची पिण्याची नळ पाणीपुरवठा व्यवस्था तात्पुरती बंद ठेवली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली असून, नागरिकांनी पिण्यासाठी याच पाण्याचा वापर करावा. नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी.