कोल्हापूर : विदर्भ, मराठवाडा पाण्याने तहानलेला असताना आणि तेथील जनता भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असताना कोल्हापूर जिल्हा मात्र पाण्याच्या बाबतीत नशीबवान ठरला आहे. कोल्हापूरकरांना अद्याप तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा जिल्ह्यातील धरणांतून उपलब्ध आहे.कोल्हापूर जिल्ह्यात चौदा लहान-मोठी धरणे असून, प्रत्येक वर्षी या धरणांत पावसाळ्यात ८८ टीएमसी जलसंचय होतो. मंगळवारी जलसंपदा विभागाने जी आकडेवारी प्रसिद्ध केली, त्यावरून या सर्व धरणांत मिळून २८.५३ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा पाहता कोल्हापूरकरांची किमान तीन महिन्यांची गरज आरामात पूर्ण होईल. जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला शेती आणि पिण्यासाठी सरासरी ९ ते १० टीएमसी पाण्याचा वापर होतो, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या हिशेबाने पुढचे अडीच ते तीन महिने जरी पाऊस लांबला तरी कोल्हापूरकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. तरीही सर्वच धरणांतून आता गरज इतकेच पाणी सोडण्यात येत आहे. राधानगरी ६६.५७ (५९०.९८) तुळशी ३६.२४ (६१६.९१)वारणा ५३२.३४ (६२६.९०) दूधगंगा २०६.६३ (६४६)कासारी २८.९७ (६२३.००) कडवी २९.८९ (६०१.२५)कुंभी २६.८२ (६१२.२०) पाटगाव ३६.४० (६२६.६०) चिकोत्रा ८.४१ (६८८.००)चित्री १३.८० (७१८.९०)जंगमहट्टी ९.१२ (७२६.२०) घटप्रभा २२.४६ (७४२.३५) जांबरे ०.०० (७३७.२३) कोदे ल. पा. १.२३ (१२२.००)असा आहे पाणीसाठाजिल्ह्यात मंगळवारी सकाळी सातच्या नोंदीनुसार धरणांतील पाणीसाठ्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. अनुक्रमे धरणाचे नाव, आजचा पाणीसाठा, पूर्णसंचय पाणीसाठा कंसामध्ये दर्शविण्यात आला आहे. सर्व आकडे दशलक्ष घनमीटरमध्ये आहेत.आजच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी १३ फूट ६ इंच, सुर्वे ११ फूट, ३ इंच, रुई ४२ फूट, तेरवाड ३५ फूट ६ इंच, शिरोळ २७ फूट, नृसिंहवाडी २३ फूट.
तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा
By admin | Updated: June 3, 2015 01:06 IST